पुणे

छत्रपती कारखान्यासाठी ६०० उमेदवारी अर्ज

CD

वालचंदनगर, ता. १५ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ६०० नागरिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये काही विद्यमान संचालकांचाही समावेश आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक २०१५ नंतर दहा वर्षांनी होत आहे. विद्यमान संचालक मंडळाला पाच वर्षांऐवजी दहा वर्षाचा कालावधी मिळाला. बारामती व इंदापूर तालुक्याच्या सीमेवरती असणाऱ्या छत्रपती कारखान्याचे संचालक होण्यासाठी अनेक सभासद इच्छुक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संघाचे व छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये युती झाल्यामुळे निवडणुकीचे वातावरण बदलले आहे. निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता असल्यामुळे पवार व जाचक यांच्या पॅनेलमधून उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक इच्छुक आहेत.
मंगळवारी (ता. १५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ६०० नागरिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अजित पवार यांनी जाहीर सभेमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे जाहीर केले असले, तरीही अनेक
विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पवार व जाचक यांच्या पॅनेलमध्ये कुणाची वर्णी लागणार, याकडे इंदापूर व बारामतीसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT