पुणे

‘छत्रपती’च्या उपाध्यक्षपदी कोणाला मिळणार संधी? कोणाला मिळणार संधी?

CD

वालचंदनगर, ता. २७ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी बुधवारी (ता. २८) होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक हे पाच वर्षे काम पाहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांची निवड होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. तसेच, पाच वर्षामध्ये पाच गटातील पाच उपाध्यक्ष होणार असल्याचेही अजित पवार यांनी जाहीर सभेमध्ये सांगितले आहे. त्यामुळे पहिल्या उपाध्यक्षपदासाठी बारामती की इंदापूर तालुक्यातील कोणत्या गटामधील संचालकाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक १८ मे रोजी पार पडली. १९ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या श्री जय भवानीमाता पॅनेलचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार विजयी झाले आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर हे काम पाहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT