पुणे

जंक्शनला एमआयडीसी मंजूर करून विकासाला गती

CD

राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे मामा यांनी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये जंक्शनला एमआयडीसी मंजूर करून तालुक्याच्या विकासाला गती दिली. मामांच्या दूरदृष्टीमुळे तालुक्यातील नवनवीन उद्योग येणार असून, युवकांना उद्योजक होण्याची व रोजगारच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
- रोहित वसंत मोहोळकर,
माजी उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर
सरपंच, आनंदनगर ग्रामपंचायत, इंदापूर

इंदापूर तालुक्यातील पश्‍चिम भागातील जंक्शन हे महत्त्वाचे व लघुउद्योजकांचे गाव म्हणून ओळखले जाते. जंक्शनमध्ये साखर कारखाने, सिमेंट कारखाने, बॉयलर, एरोस्पेस, पोकलेन मशिनचे बूम, थर्मल पॉवर साठी लागणारी विविध उपकरणे तयार करण्याचे कामे उद्योजक करीत आहेत. जंक्शनमध्ये तयार करण्यात येणारी विविध उपकरणे देश-विदेशामध्ये निर्यात होत असतात. येथील उद्योजकांचे गेल्या ४० वर्षांपासून एमआयडीसी सुरू करण्याची मागणी प्रलंबित आहे.

मामांनी सोडविला एमआयडीसीचा प्रश्‍न...
जंक्शनमध्ये मिनी एमआयडीसी सुरू करण्याची १९८५ पासून जंक्शनकरांची मागणी होती. उद्योजकांना ४० वर्षांपासून अनेक आश्‍वासने मिळत होती. मात्र, प्रत्यक्षात कृती झाली नाही. राज्याचे कॅबिनेटमंत्री दत्तात्रेय भरणे मामांनी जंक्शनच्या एमआयडीसी विषयामध्ये लक्ष घालून तातडीने एमआयडीसीचा प्रश्‍न मार्गी लावला.
---
एमआयडीसीसाठी १३१ हेक्टर क्षेत्र करून दिले उपलब्ध
एमआयडीसी म्हटले की, जागा महत्त्वाची असते. मामांनी कोणत्याही शेतकऱ्यांची, नागरिकांची एक गुंठा जमीन न घेता महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे १३१ हेक्टर क्षेत्र एमआयडीसीसाठी उपलब्ध करून दिले. लासुर्णे, जंक्शन, भरणेवाडी व अंथुर्णे गावाच्या हद्दीमधील एमआयडीसीचे क्षेत्र आहे. या गावाच्या परिसरामध्ये एमआयडीसी होणार असल्याने विकासाला चालना मिळणार आहे.


उद्योजकांना नवनवीन संधी
जंक्शनची एमआयडीसी इंदापूर तालुक्याच्या विकासाचा मैलाचा दगड ठरणार आहे. या एमआयडीसीमुळे तालुक्याच्या विकासाच्या गतीला बुस्टर मिळणार आहे. इंदापूर तालुक्याची नवीन ओळख निर्माण होणार आहे. नवउद्योजकांना नव्याने नव्याने उद्योगधंदे सुरू करण्यासाठी नव्याने संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच इंदापूर तालुक्याच्या परीसरातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
--
देशाच्या नकाशावर चमकणार इंदापूरचे नाव
इंदापूरची ओळख कृषी प्रधान आहे. तालुक्याला नीरा -भीमा नद्यांचा व उजनी पाणलोट क्षेत्राचा भव्य किनारा लाभला आहे. तालुक्यातील लोणीमध्ये एमआयडीसी असून, सध्या अनेक कंपन्या कार्यरत आहेत. तसेच भिगवण जवळ बिल्ट ग्राफिक्स ही कागद निर्मिती करणारी कंपनी आहे. वालचंदनगर येथील वालचंदनगर इंडस्ट्रीजने इंदापूरचे नाव स्वातंत्र पूर्व काळापासून देशाच्या नकाशावर चमकवत आहे. जंक्शनला एमआयडीसी झाल्यामुळे इंदापूरचे नाव देशाच्या नकाशावर चमकण्यास मोलाची मदत होणार आहे.

उद्योगांना मिळणार बूस्टर
जंक्शन परिसरामध्ये सुमारे १०० पेक्षा जास्त लघुउद्योजक असून, त्यांच्या स्वत:च्या जागेमध्ये वर्कशॉप आहेत. या वर्कशॉपमध्ये वालचंदनगर कंपनीचे सुट्टे भाग, साखर कारखाने, सिमेंट कारखाने पॉवर प्लॅंटचे सुट्टे भाग तयार करण्यात येत आहे. मेट्रो रेल्वेसाठी लागणारे सुट्टे भाग सुरू करून देशातील, परदेशातील कंपन्याना सुट्टे भाग पाठविण्यात येतात. लहुउद्योजकांना उद्योगासाठी जागा अपुरी पडत आहेत. तसेच इतर सुविधा मिळत नाही. जंक्शनमध्ये एमआडीसी सुरू झाल्यामुळे उद्योजकांना सुविधा मिळणार असून उद्योगधंद्याना बूस्टर मिळेल.

05175

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT