पुणे

‘हार नको, गुच्छ नको, कारखान्याला ऊस द्या’

CD

वालचंदनगर, ता. ११ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सत्काराला हार-गुच्छ देऊ नका, पण कारखान्याला गाळपासाठी ऊस देण्याची अनोखी संकल्पना राबविली असून शेतकऱ्यांना भावत आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक गेल्या महिन्यामध्ये झाली. निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे व राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या श्री जय भवानीमाता पॅनेलने विरोधकांचा धुरळा उडवून एकतर्फी विजय मिळविला. कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्षपदी कैलास गावडे यांची बिनविरोध निवड झाली. विजयानंतर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाला गावोगावी सत्कारासाठी निमंत्रण येत आहेत. मात्र, संचालक मंडळाने शेतकऱ्यांना आवाहन केले असून, ‘आम्हाला सत्काराला हार -गुच्छ देवू नका. तुम्ही मताच्या रूपाने आमचा सत्कार केला आहे. हार-गुच्छ नको...पण गाळपासाठी आपल्या कारखान्याला ऊस द्या.’
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये छत्रपतीच्या सभासदांचा सुमारे ८ ते ९ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असतो. मात्र, काही सभासद ऊस गाळपासाठी छत्रपती कारखान्याला न देता दुसऱ्या कारखान्यांना देत असतात. याचा परिणाम छत्रपतीच्या गाळपावर होत असून गाळप कमी होत असल्याने कारखान्याचे व सभासदांचे नुकसान होते. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या हार नको, गुच्छ नको... गाळपासाठी ऊस कारखान्याला द्या ही संकल्पना सभासदांना भावली असल्याचे उद्योजक उत्तम फडतरे यांनी सांगितले.

या संदर्भात पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये १२ लाख टन ऊस गाळप होणे गरजेचे आहे. तसेच साखरेचा उताराही जास्त मिळावा, यासठी संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. यापूर्वी छत्रपतीच्या कार्यक्षेत्रामध्ये १२ टक्के पेक्षा जास्त उतारा मिळाला होता. सभासदांनी चालू वर्षी सर्व ऊस आपल्या श्री छत्रपती कारखान्याला देवून सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

सकाळच्या चहा-नाश्त्याला परफेक्ट क्रंच! कुरकुरीत मसूर डाळ वड्यांची झणझणीत रेसिपी लगेच लिहून घ्या!

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

SCROLL FOR NEXT