पुणे

भवानीनगर येथील सराफाला अटक

CD

वालचंदनगर, ता. १८ : चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्रीपाद ज्वेलर्सचे सराफ पंकज विलास शहाणे (वय ४८) याला अटक केली आहे. याप्रकरणी इंदापूर न्यायालयाने शहाणे याला शनिवार (ता. १९) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर २०२४ या दिवशी बेलवाडी (ता. इंदापूर) येथील सोनाली पप्पू सावंत यांच्या घरातून चौघाजणांनी एक लाख ७७ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गेल्या महिन्यामध्ये मयूर ऊर्फ गांगल्या ऊर्फ संदेश भोसले (वय २१, रा. सोनगाव, ता. बारामती) याला अटक केली होती. तसेच गेल्या आठवड्यामध्ये समीर ऊर्फ बोतल करवंद काळे (वय ३६) याला अटक केल्यानंतर चोरट्यांनी चोरीचे सोने भवानीनगरमधील सराफ शहाणे याला विकल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शहाणे याला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Latest Marathi News Live Update : गॅस टंचाईमुळे लग्नसराईत अडचण; दोन हजार पाहुण्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह

स्टार प्रवाहवरची 'ही' नायिका आहे तेजश्री प्रधानची बेस्ट फ्रेंड; शेअर केला फोटो; म्हणाली, 'ती माझी सपोर्ट सिस्टीम...'

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

SCROLL FOR NEXT