पुणे

‘छत्रपती’च्या १ लाख ६१ हजाराव्या साखरेच्या पोत्याचे पूजन

CD

वालचंदनगर, ता. २५ : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील १ लाख ६१ हजार व्या पोत्यांचे पूजन करण्यात आले.
कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे. २४ दिवसांमध्ये कारखान्याने १ लाख ६६ हजार ९५ टनाचे गाळप केले आहे. कारखान्याचा सरासरी रिकव्हरी ९.८४ टक्के असून सोमवारी (ता.२४) रिकव्हरी १०.७५ टक्के होती. कारखान्याने सहवीज निमिर्ती प्रकल्पातून ४८ लाख २३ हजार युनिट वीजेची निर्यात केली आहे. मंगळवारी (ता.२५) कारखान्याच्या १ लाख ६१ हजाराव्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संचालक रामचंद्र निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक शिवाजी निंबाळकर, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी सागर राजपुरे, सुचिता सचिन सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, वित्त व्यवस्थापक हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, सभासद व कामगारांच्या सहकार्यामुळे कारखाना सुरळीत सुरू आहे. जास्तीजास्त गाळप करून कारखाना अडचणीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा सुरू असून सभासदांनी सर्व ऊस आपल्या कारखान्याला देण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांनी केला संचालक मंडळाचा सत्कार
श्री छत्रपती कारखान्याचा कारभार पारदर्शक सुरू आहे. संचालक मंडळाचा जास्तीजास्त गाळप करण्याचा प्रयत्न आहे. संचालक मंडळाच्या कारभारावर शेतकरी समाधानी असल्यामुळे काटेवाडीमधील शेतकरी संभाजी काटे, सतीश काटे, शीतल काटे, नितीन काटे, मिलिंद काटे, संजय काटे, भाऊसाहेब काटे, बाळासाहेब काटे, सागर काटे, राजेंद्र काटे, शरद काटे, दिलीप देशमुख, समीर जाधव, तानाजी काटे, योगेश काटे, प्रमोद काटे, हनुमंत जाधव, सूरज काटे, युवराज काटे यांच्यासह शेतकऱ्यांनी संचालक मंडळाचा सत्कार केला.

5651

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

Latest Marathi News Live Update : गॅस दरवाढीवरून रिक्षाचालकांचा संताप, गॅस पंपाला घेराव

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

SCROLL FOR NEXT