पुणे

शून्य मशागत तंत्रातून अधिक उत्पादनाची किमया

CD

वालचंदनगर, ता.२९ : थोरातवाडी (ता. इंदापूर) येथील प्रगतशील शेतकरी केशव नगरे व कीर्ती नगरे यांनी शून्य मशागत तंत्राचा उपयोग करून शेतजमीन न नांगरता ‘विना नांगरणी शेतीचा’ प्रयोग यशस्वी केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून जमीन न नांगरताच शेतात सोयाबिन, ऊस, हरभरा व तुरीचे अधिक उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.
नगरे यांच्याकडे पावणे सात एकर क्षेत्र आहे. शेतीमध्ये सातत्याने नव्याने प्रयोग करण्याची कीर्ती नगरे यांना आवड आहे. नगरे कुंटूबाने गेल्या दोन वर्षांपूर्वी एकरी १०० टनांपेक्षा जास्त उसाचे उत्पादन घेतले होते. तसेच सेंद्रिय शेती करण्यावर त्यांचा भर असून जिवाणू, बॅकटेरिया, गोमूत्र अर्क बनवून घरीच तयार करत असून शेतीसाठी वापरत असतात.

गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी पावणेदोन एकर क्षेत्र नांगरलेच नाही. त्यांनी २०२२ च्या उन्हाळ्यात शेतीची नांगरणी केली होती. नांगरणीनंतर त्यांनी ऊस लागवड करण्यासाठी पाच फुटीमध्ये जुलै २०२२ मध्ये त्यांनी बेडवर सोयाबिन लावले. तीन महिन्यांत सोयाबिनचे १४ क्विंटल उत्पादन घेतले. ऑक्टोबर २०२२ उसाची बेडवर उसाच्या रोपांची लागवड केली. दरम्यानच्या काळामध्ये सोयाबिनच्या पडलेल्या बियांमुळे सोयाबिन उगवले. उसामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीनचे दुसरे पीक घेतले. त्यामधून पाच क्विंटल उत्पादन निघाले. पावणेदोन एकरांत १०५ टन उसाचे उत्पादन घेतले. उसाचा खोडवा ठेवला. पावणेदोन एकरामध्ये खोडव्यामधून १०० टनांचे उत्पादन निघाले. खोडवा तुटल्यानंतर खोडव्याची मुळे तणनाशक फवारून जाळली. जानेवारी २०२५ नांगरणी न करताच बेडवर सेंद्रिय हरभऱ्याची लागवड केली. हे पीक निघाल्यानंतर जून २०२५ मध्ये तुरीची लागवड केली केली. सध्या हे पीक जोमात आहे, असे नगरे यांनी सांगितले.

असे मिळाले उत्पादन
सोयाबिन............१४ क्विंटल
ऊस ............१०५ टन
हरभरा............९.५ क्विंटल


यंदा वर्षी राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेकांची पिके पाण्यात गेली. मात्र, बेडवर तुरीची लागवड असल्यामुळे तुरीचे पीक जोमात आले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या तुरी पावसाच्या पाण्यामुळे ओंबाळून गेल्या आहेत. आमची तूर बेडवर असल्यामुळे चांगली आली.
- केशव नगरे

जमीन न नांगरता शेती केल्याचा फायदा होत आहे. यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मोलाची मदत होत आहे. पिकांचे मुळाचे अवशेष कुजत असल्यामुळे जमिनीत जिवाणूंची संख्या वाढून अन्नद्रव्यांचा चांगला पुरवठा होतो. तसेच पिकांमुळे कुजविल्यामुळे तसेच जमिनीमध्ये वापसा राहिल्यामुळे जमिनीत ऑक्सिजनचे प्रमाण वाढत असून पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने होत आहे.
- कीर्ती नगरे


विना नांगरणी शेतीचे फायदे...
- पिकांचीमुळे जागेवर कुजविल्यामुळे जमिनीत पोकळी निर्माण
- उत्पादित पिकांच्या मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा जास्त
- रासायनिक खतांची गरज कमी होते
- शेतीमधून पिकलेल्या उत्पादित धान्याची गुणवत्ता सुधारते.
- पाचट तसेच पालापाचोळा जागेवरही कुजवल्यामुळे जमिनीमध्ये सतत आच्छादन राहते. पिकांचे पोषण चांगल्या पद्धतीने होते.
- रोगकिडीचे प्रार्दुभाव कमालीचे कमी होत आहे.
- पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मोलाची मदत
- जमिनीची प्रत सुधारते. मजुरांचा खर्च वाचतो
05657

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात भूकंप, 'या' कंपन्यांचे शेअर्स गडगडले

Manoj Jarange Patil: सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन: मनोज जरांगे पाटील, सात तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित!

Sahyadri tiger reserve update : ‘सह्याद्री प्रकल्प’मध्ये ‘शिलेदार’ची एन्ट्री, ‘तारा’सोबत जमणार का जोडी? निसर्गप्रेमींसाठी उत्सुकता

Israel-Iran war: इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT