पुणे

‘छत्रपती’चे चार लाख टन गाळप पूर्ण

CD

वालचंदनगर, ता.२४ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने ५३ दिवसांत चार लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून दुसऱ्या पंधरवड्यातील ३७.१५ कोटी रुपयांचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामास एक नोव्हेंबरपासून सुरवात झाली आहे. कारखान्याने मंगळवारी (ता.२३) ५३ दिवसांत चार लाख ६७६ टन ऊस गाळप केले आहे. तर चार लाख २३ हजार २०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून १ कोटी २६ लाख ५००० युनिट वीज महावितरणाला विक्री केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, व्यवस्थापक हनुमंत करवर यांनी दिली.

सभासदांना मिळणार वाढीव दर
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये उसाच्या रिकव्हरी (साखरेचा उतारा) वाढ झाली आहे. कारखान्याची मंगळवारी (ता.२३) उसाची रिकव्हरी ११.५५ टक्क्यांपर्यंत पोचली आहे. सरासरी रिकव्हरी १०.७९ टक्के झाली असून रिकव्हरीत वाढ झाल्यामुळे सभासदांना वाढीव दर मिळण्यास मोलाची मदत होणार आहे.


सर्व ऊस छत्रपतीला द्यावा
यासंदर्भात श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे व संचालक मंडळाने सांगितले की, कारखान्याचे सभासद,कामगार,कर्मचारी सहकार्य करीत असल्यामुळे कारखान्याने गाळपात आघाडी घेतली आहे. संचालक मंडळाने १२ लाख मेट्रीक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याचे पूर्वीचे वैभव मिळविण्यासाठी सभासदांनी सर्व ऊस श्री छत्रपती कारखान्याला देण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

वजन चोख अन् पैसे रोख
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने १६ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीमध्ये गाळप केलेल्या उसाचे ३७.१५ कोटी रुपये २५ डिसेंबरच्या सुट्टीमुळे एक आदोगर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. वजन चोख, पैसे रोख... या शब्द प्रयोगासाठी संचालक मंडळ रात्रंदिवस काम करीत आहे. कारखान्याने पहिल्या पंधरवड्यातील २९.९८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वीच जमा केले होते. तसेच तोडणी व वाहतुकीचे पहिल्या पंधरवड्यातील दोन कोटी पाच लाख रुपये वाहतूकदारांच्या खात्यावर जमा केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

Dapoli News : कोकण दीपकाडीला जागतिक व्यासपीठ; संवर्धनासाठी जनतेला मतदानाचे आवाहन

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

SCROLL FOR NEXT