पुणे

भरणे- पाटील जोडीच्या मैत्रीवर जनतेची मोहर

CD

वालचंदनगर, ता. १० : इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजपसह इतर पक्षाच्या उमेदवारांचा धुव्वा उडवून सर्वच जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळावले. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समेटमुळे राष्ट्रवादीला ऐतिहासिक विजय मिळाला. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपला तालुक्यात खातेही उघडता आले नाही.
इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे आठ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी निवडणूक झाली. पुणे जिल्हा परिषदेवरती झेंडा फडकविण्यासाठी इंदापूर तालुका महत्त्वाचा ठरणार असल्याचे ओळखूनच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दत्तात्रेय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये निवडणुकीपूर्वीच समेट घडवून आणली होती. दोन्ही राष्ट्रवादीने ‘घड्याळा’च्या चिन्हावर निवडणूक लढवली. भरणे व पाटील यांच्या एकत्रीकरणाचा फायदा दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसला झाला. भाजपचे नेते प्रदीप गारटकर व जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी तालुक्यामध्ये भाजपला यश मिळवून देऊन कमळ फुलविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. त्यांना तालुक्यामध्ये एकाही जागेवरती खाते उघडता आले नाही. तसेच, शिवसेना, बसपच्या उमेदवारांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अपघाती निधनाचा निवडणुकीवरती परिणाम झाला. तालुक्यामध्ये राष्ट्रवादीने प्रचारसभा घेतल्या नाहीत. सहानुभूतीच्या लाटेचा राष्ट्रवादीला फायदा झाला. वडापुरी- माळवाडी, काटी- लाखेवाडी गटामध्ये निवडणूक चुरशी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र यशराज जगदाळे यांनी माजी पंचायत समितीचे सदस्य सतिश पांढरे यांचा पराभव केला. तसेच, काटी- लाखेवाडी गटामधील राष्ट्रवादीचे श्रीमंत ढोले यांनी माजी सभापती विलास वाघमोडे यांचा पराभव केला.
यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दत्तात्रेय भरणे व हर्षवर्धन पाटील हे एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत होते. दोघांचीही झेडपी व पंचायत समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी चढाओढ सुरु होती. मात्र, या निवडणुकीमध्ये दोघेही एकत्र आल्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस राहिली नव्हती. येणाऱ्या काळामध्ये भरणे व पाटील यांचे पदाधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कारभार एकत्र करतानाचे चित्र तालुक्यात दिसणार आहे.

नेत्यांच्या दुसऱ्या पिढीची एन्ट्री
कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा मुलगा श्रीराज भरणे यांचा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश झाला. भरणे यांची दुसरी पिढी राजकारणामध्ये सक्रिय झाली असून, बोरी गणातून श्रीराज भरणे पंचायत समितीचे सदस्य झाले आहे. तर, जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांचा मुलगा यशराज जगदाळे यांचाही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश झाला. ते वडापुरी- माळवाडी गटातून जिल्हा परिषदेसाठी विजयी झाले. तसेच, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील- ठाकरे या बावडा- लुमेवाडी गटातून विजयी झाल्या आहेत. त्या दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेच्या सदस्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar Press : रोहित पवारांनी अजित पवारांना घेवून जाणाऱ्या ‘VSR’ विमान कंपनीच्या मालकाचा 'तो' दावा खोडून काढला अन् म्हटले...

प्राजक्ता माळी की तेजश्री प्रधान कोण आहे वरचढ? एक व्यवसायात अग्रेसर, तर दुसरीचे सुपरहिट सिनेमे, कोणाचं नेटवर्थ जास्त?

'मेरा नाम चिन चिन चू...' फेम हेलन ८६व्या वर्षीही कशा आहेत एवढ्या फिट? त्यांच्या व्यायामाच्या टिप्स एकदा वाचाच

ZP–PS Elections : पन्हाळ्यात जनसुराज्यचा गड ढासळला; तर शाहूवाडीत ‘जनसुराज्य’ची जोरदार मुसंडी

"मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही.." रिलेशनशिपवर रिंकूचा खुलासा; म्हणाली..

SCROLL FOR NEXT