पुणे

गाव ते ग्लोबल संकल्पना प्रत्यक्षात आणणार

CD

वालचंदनगर, ता. १० ः ‘‘गाव ते ग्लोबल ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी फडतरे नॉलेज सिटी प्रयत्न करणार आहे. स्मार्ट व्हिलेज ते स्मार्ट सिटी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी चर्चासत्र मैलाचा दगड ठरेल. भारताच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जगामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये सहज काम करू शकतात. आज वालचंदनगर व कळंब परिसरातून शिक्षण घेणारे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये यशस्वीपणे काम करीत आहेत,’’ अशी माहिती फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी दिली.
कळंब (ता. इंदापूर) येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र समारोपाच्या कार्यक्रमामध्ये फडतरे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘‘भारतीय विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मिळत असते. या योजनांची माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नाही. येणाऱ्या काळामध्ये परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना ग्लोबल साऊथ- नॉर्थ सहकार्याच्या माध्यमातून फडतरे नॉलेज सिटीसह इतर शैक्षणिक संस्थांना जागतिक नेटवर्कशी जोडणार आहे.’’
परिषदेमध्ये लंडनमधील आफ्रिका- एशिया स्कॉलर ग्लोबल नेटवर्क, ग्लोबल साऊथ इकॉनॉमी फोरम संस्थापक अब्दुल दिवाले मोहमद, अमेरिकेतील लॅगबस्टेक विद्यापीठाचे चान्सलर डॉ. के. एस. चरक यांच्यासह अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर, डॉ. राजेंद्रकुमार टेटेड, डॉ. एल. के. त्रिपाठी, डॉ. आनंदराव दडस, डॉ. धनंजय बागूल, डॉ. पिसाळ, डॉ. दिदार अली तांबोळी फडतरे नॉलेज सिटीचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. अरुण इंगळे यांनी मार्गदर्शन केले.
चर्चा सत्रामध्ये शाश्वत विकास, युवक सक्षमीकरण, सामाजिक परिवर्तन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य, फार्मसी क्षेत्रात औषधनिर्मिती, डिजिटल हेल्थ, फार्माकोव्हिजिलन्स, क्वालिटी कंट्रोल यावर चर्चा झाली. अभियांत्रिकी शाखेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, ऑटोमेशन, इंडस्ट्री ४.०, शाश्वत अभियांत्रिकी यांचा समावेश होता. व्यवस्थापन क्षेत्रात नेतृत्व विकास, उद्योजकता, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, नवोन्मेष व्यवस्थापन, शाश्वत विकास धोरणे यावर सत्रे पार पडली. परिषदेमध्ये मौखिक व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. परिषद यशस्वी करण्यासाठी फार्मसी प्राचार्य डॉ. प्रवीण उत्तेकर, ए.बी.ए. प्रमुख डॉ. विपुल निंबाळकर, इंजिनिअरिंगच्या प्राचार्य डॉ. सोनाली देशमुख यांनी प्रयत्न केले.

05773

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

दिग्गज क्रिकेटपटूचे वाढदिवशीच निधन... होणाऱ्या पत्नीच्या निधनाची बातमी कळूनही संघासाठी उतरले होते मैदानात

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले

Climate Change Health Impact: हवामान बदलाचा आरोग्याला फटका! ताप, सर्दी-खोकला आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत मोठी वाढ

4 वर्षांचा प्रवास थांबणार, स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, मुख्य नायिकेची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT