वालचंदनगर, ता. १४ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या साखरेचा गोडवा वाढला आहे. सन २०२५-२६ च्या गाळप हंगामात ११.३५ टक्के साखर उतारा मिळाला आहे. चालू गळीत हंगामातील हा साखर उतारा गेल्या दहा वर्षातील उच्चांकी ठरला आहे. उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना अधिकची एफआरपी मिळणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक मंडळातर्फे देण्यात आली.
कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासह संचालक मंडळाने २०२५-२६ चा गळीत हंगाम सभासदांच्या विश्वासावर पार पाडला. संचालक मंडळ रात्रंदिवस कारखान्याच्या कारभारावर लक्ष ठेऊन होते. उसाची रिकव्हरी वाढली तर सभासदांना जादाचा ऊस देणे शक्य असते हे सूत्र ओळखून संचालक मंडळाने सुरवातीपासून ऊस तोडणीचे अचूक नियोजन केले. उसाच्या वाणानुसार तोडी दिल्या, वशिलेबाजीने तोडीवर नियंत्रण आणले. सुरुवातीपासून परिपक्व ऊस गाळप केल्यामुळे उसाच्या उताऱ्यात वाढ झाली. दहा वर्षामध्ये पहिल्यांदाच सरासरी रिकव्हरी ११ टक्के पेक्षा जास्त मिळाली आहे. सन २०२५-२६ च्या गळीत हंगामामध्ये सरासरी रिकव्हरी ११.३५ टक्के मिळाली.
सभासदांचा विश्वास वाढला...
सन २०२४-२५ च्या गळीत हंगामध्ये कारखान्याचे गाळप पाच लाख ९० हजार ३१३ मेट्रीक टन झाले होते.यामध्ये सभासदांचा ऊस ४ लाख २१ हजार १५२ टन व गेटकेनचा ऊस १लाख ६९ हजार १६१ टन होता. चालू वर्षी कारखान्याने ७ लाख ५५ हजार ४९६ टन गाळप केला असून यामध्ये सभासदांचा ६ लाख २६ हजार १५२ टन व गेटकेनचा १ लाख २९ हजार ३४४ टन उसाचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये सभासदांचा २ लाख ५ हजार टनापेक्षा जास्त उसाचे गाळप झाले असून सभासदांचा छत्रपतीच्या संचालक मंडळावर विश्वास वाढला आहे.
गेल्या दहा वर्षांतील सरासरी उतारा कंसामध्ये टक्केवारीत
२०१६-१७ (१०.९२)
२०१७-१८ (१०.९१)
२०१८-१९ (११.००)
२०१९-२० (१०.४५)
२०२०-२१ (१०.९०)
२०२१-२२ (१०.९६)
२०२२-२३ (१०.६१)
२०२३-२४ (१०.७०)
२०२४-२५ (१०.८०)
२०२५-२६ (११.३५)
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षीच्या उताऱ्यात जिल्हात बाजी मारली आहे. रिकव्हरीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा ऊस दर देणे शक्य होणार आहे.
- पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष, छत्रपती साखर कारखाना
05781
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.