पुणे

कळंबमध्ये बुधवारी नोकरी मेळावा

CD

वालचंदनगर : कळंब (ता.इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीमध्ये बुधवारी (ता.४) नोकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती फडतरे नॉलेज सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय फडतरे यांनी दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोकरी संधी उपलब्ध होण्यासाठी आयोजित मेळाव्यामध्ये १२ पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन मेळाव्यामध्येच नोकरीची संधी देण्यात येणार आहे. परिसरातील दहावी, बारावी, आय.टी.आय, इंजिनिअरिंग, पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरीचे संधी मिळणार आहे. मेळाव्याला येताना इयत्ता दहावी, बारावीची गुणपत्रिका, पदवी घेतलेली गुणपत्रिका, आधार कार्ड, आय.कार्ड फोटो, सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीचे किमान ५ सेट घेऊन येण्याचे आवाहन जय फडतरे व आयटीआयचे प्राचार्य गणेश चव्हाण यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rail Bottle Rate: कडक उन्हाळ्यापूर्वी मोठा दिलासा! पाण्याच्या बाटलीची किंमत कमी होणार; पण कितीने आणि का?

IND vs AUS: निवृत्तीच्या वनडेत एलिसा हेलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईटवॉश

"मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते.." प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा ; "मला नवऱ्याचा पगार माहित नाही"

Navi Mumbai: ऐरोलीत ‘नो पार्किंग’ फलक नाममात्र! रुग्णालयाबाहेर बेकायदा पार्किंग; रुग्ण, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा

Solapur News: पत्नीला उचलून आपटल्याने गर्भपात; साेलापूरातील मन हेलवणारी घटना, चारचाकी गाडी अन् पैशासाठी नेमकं काय घडलं!

SCROLL FOR NEXT