पुणे

कोल्हापुरातील कारखान्याला ‘छत्रपती’च्या संचालकांची भेट

CD

वालचंदनगर, ता.१६ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कार्यक्षेत्रामध्ये उसाची उपलब्धता वाढावी, एकरी उसाचे वजन वाढावे तसेच साखरेचा उतारा वाढविणाऱ्या ऊस जातीच्या लागवडीसाठीच्या माहितीसाठी कोल्‍हापूर जिल्ह्यातील शिरोळ श्री दत्त सहकारी साखर कारखान्यास नुकतीच भेट दिली.

‘छत्रपती’च्या संचालक मंडळाने कार्यक्षेत्रामध्ये उसाची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कारखान्याने नुकतीच मार्च व एप्रिल महिन्यामध्ये ही उस लागवडीसाठी परवानगी दिली आहे. कोल्हापूर जिल्हातील शिरोळमधील श्री दत्त सहकारी साखर कारखान्यान्यातर्फे एकरी १५० टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच सुपर केन नर्सरीचे तंत्रज्ञान, पाने व पाणी परीक्षण लॅब, सेंद्रिय कर्ब वाढीचा केलेला प्रयत्न, क्षारपड मुक्त जमीन करण्याचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, नीलेश टिळेकर, संतोष मासाळ, सतीश देवकाते, सूचिता सपकळ, सचिन सपकळ यांच्यासह कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दत्त साखर कारखान्याला भेट देऊन विविध उपक्रमाची माहिती घेतली. यावेळी मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील, श्री दत्त सहकारी कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही.पाटील यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

Pune crime news : पुण्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या; मृतदेह झुडपात लपवला, मुंबई-बंगळूर महामार्गावर लोकांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT