पुणे

इंदापुरात वीजे अभावी पिके लागली सुकू

CD

वालचंदनगर, ता. २२ : इंदापूर तालुक्यातील नागरिक विजेच्या भारनियमामुळे त्रस्त झाले आहेत. तालुक्यामध्ये बहुतांश गावांत सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भारनियमन करण्यात येत आहे. पाणी असूनही पिकांना पाणी देत नाही. त्यामुळे पिके सुकू आहेत. त्यामुळे या भारनियमनाची वेळ बदलण्याची मागणी नागरिक, शेतकऱ्यांकडून होत आहे.

सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. संध्याकाळच्या वेळी वीज नसल्यामुळे मुलांच्या अभ्यासाचा खोळंबा होत आहे. तसेच शेतकऱ्यांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील, निमसाखरचे माजी उपसरपंच नंदकुमार रणवरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी भारनियमनाच्या वेळेमध्ये बदल करून भारनियमन कमी करण्याची मागणी महावितरणकडे केली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. महावितरणने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भारनियमनाच्या वेळेमध्ये बदल करावा. तसेच सध्या चार तास सुरू असलेले भारनियमन दोन तास करण्याची मागणी केली आहे.

पिके जळण्याचा धोका
शेतीचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना त्रास होत आहे. सध्या उन्हाळ्याची सुरुवात झाली असून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी असूनही पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

चार दिवसांनी निर्माण होणारा गजकेसरी योग 'या' चार राशींना करणार मालामाल ! आनंदाचे दिवस होणार सुरू

Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT