पुणे

वाल्हे पालखीतळास निधी देण्याचे आदेश

CD

वाल्हे, ता. ८ : ‘‘पालखीसाठी वाल्हे (ता. पुरंदर) गावाने १४ एकर जागा दिलेली असून, तळाभोवती गावाने लावलेली झाडे कौतुकास्पद आहे. पालखीतळाच्या विस्तारीकरणाबरोबरच पालखीतळाकडे येण्यासाठीचे दोन्ही पर्यायी मार्गाची पुनश्च पाहणी करून या मार्गावर कायमस्वरूपी पक्का रस्ता तयार करा. तसेच, पालखीतळाच्या सुशोभीकरणासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार एक ते दोन कोटी रुपयांची भरीव मदत द्या,’’ असे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिला.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत्या १७ जून रोजी वाल्हे येथे विसावणार आहे. त्या अनुषंगाने पालखी पूर्वतयारी म्हणून गुरुवारी (ता. ८) महसूलमंत्री विखे पाटील यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने पाहणी दौरा केला. त्यावेळी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, संत ज्ञानेश्वर पालखी सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे
पाटील, आमदार संजय जगताप, विविध विभागांचे अधिकारी, दत्तात्रेय पवार, सुनील पवार, सत्यवान सूर्यवंशी, प्रा. संतोष नवले, धनंजय पवार, सूर्यकांत भुजबळ, संदेश पवार, दादासाहेब मदने, आनंद पवार आदी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘‘आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावरील मुक्कामाच्या पालखी तळांचे शासनाच्या वतीने सुशोभीकरण करून विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान गाड्यांची गर्दी होऊ नये म्हणून पालखीतळावर येण्यासाठी राख गायकवाडवाडी- अंबाजीचीवाडीमार्गे पालखीतळ व जाण्यासाठी सुकलवाडी-झिरीपवस्ती-गुळूंचेमार्गे नीरा दरम्यान रस्त्याचे दर्जेदार काम करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. पालखीतळाच्या सुशोभीकरणाच्या कामाला निधीची कमतरता भासू देणार नाही.’’
दरम्यान, पालखीतळावर पाणीपुरवठ्यासाठी बोअरवेलचे काम प्रगतिपथावर असल्याचे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.

पालखी ग्रामप्रदक्षिणेची मागणी
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाल्हे पालखी तळाला भेट दिल्यानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन लंबाते यांनी त्यांना वाल्हे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची ग्रामप्रदक्षिणा पुर्ववत होण्याबाबत विनंती केली. याबाबत त्यांनी याबाबत बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. त्यावर संत ज्ञानेश्वर पालखी सोहळाप्रमुख ढगे यांनी याला दुजोरा दिला. त्यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राहुल यादव, प्रवीण कुमठेकर, सागर भुजबळ, प्रदिप चव्हाण, संजय निगडे, चंद्रकांत सासवडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT