पुणे

दौंडजला विसावला सोपानकाकांच्या पालखीचे स्वागत

CD

वाल्हे, ता. ८ : संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा नीरा, वाल्हे, पिंपरे खुर्द या गावांचे स्वागत स्वीकारीत प्रथमच दौंडज (ता.पुरंदर) येथे
मुक्कामासाठी विसावला. टाळमृदंगाचा जयघोष आणि भाविकांची दर्शनासाठी उडालेली झुंबड यामुळे ''अवघी दुमदुमले दौंडज'' अशीच परिसराची अवस्था झाली
होती. यावेळी ग्रामस्थांनी पालखी जोरदार स्वागत केले.
सोरटेवाडी येथून ऊन-सावलीच्या खेळात धिम्या गतीने निघालेला पालखी सोहळा नीरेा येथे न्याहरी घेऊन आज सकाळी पिंपरे खुर्द या ठिकाणी विसावला. पिंपरे खुर्द येथे दुपारचे जेवण करून अल्पशा विश्रांतीसाठी वाल्हे (ता.पुरंदर) नजीक कामठवाडी येथे दुपारी एक वाजता विसावला. नंतर निघालेल्या पालखी सोहळ्याचे पावणेचार वाजण्याच्या दरम्यान दौंडज (ता.पुरंदर)येथे प्रथमच आगमन झाले.

दौंडज ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे सरपंच सीमा भुजबळ व उपसरपंच अमोल कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी महाराजांचा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक बी.बी.शिंदे, विजय फाळके, रामदास भोसले, सोपान दगडे, जयवंत जाधव, अमोल कदम, नितीन जाधव, सुदाम माळवदकर, लक्ष्मण दगडे, मधुकर इंदलकर, लक्ष्मण दगडे, नितीन दगडे, अब्दुल शेख, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
चोपदारांनी सूचना केल्यानंतर शेकडो वैष्णवांच्या उपस्थित समाज आरती झाली. आरतीनंतर उशिरापर्यंत भाविकांनी रांगा लावून सोपानकाकांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

दौंडज ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी भोजनाची व ठिकठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी सोहळ्यासाठी दौंडज
ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

01753

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT