पुणे

जैन संघटनांचे चारा छावणीचे काम कौतुकास्पद

CD

वाल्हे, ता. १४ : ‘‘दुष्काळी परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेता संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. छावण्यांच्या माध्यमातून हजारो लहान-मोठ्या जनावरांना मायेचा हात दिला जात असून, सामाजिक भान जपणाऱ्या जैन संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे,’’ असे गौरवोद्गार पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी काढले.

वाल्हे नजिक भुजबळ कामठवाडी (ता.पुरंदर) येथे जैन संघटनेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या चारा छावणीचे भूमिपूजन सोमवार (ता. १३) तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.

पुरंदर तालुक्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरांच्या चारा व पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्याने आता जैन संघटना सक्रिय झाल्या आहेत. वाल्हे परिसरात सामाजिक जाणिवेच्या भावनेतून चारा छावण्या स्थापन करण्यासाठी जैन संघटनेचे मदतीचा हात पुढे केला आहे. कमी पर्जन्यमानामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने
परिस्थितीची पाहणी करून टँकरच्या फेऱ्या वाढवाव्यात व गुरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते.

जैन संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पाऊल उचलले जात असून लवकरच याठिकाणी चारा छावणी सुरू करणार असल्याचा विश्वास जैन संघटनेचे रमेश नवलाखा यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला.

याप्रसंगी चारूदत्त इंगोले, अशोक पवार, सागर भुजबळ, जयवंत भुजबळ, पराग शहा, संजय दोशी, गणेश भुजबळ, सुशील भुजबळ, मंडलअधिकारी बापूसाहेब देवकर, भारत भिसे, संजय उमाप, बाबा इनामदार, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे, अजित भुजबळ, आदि उपस्थित होते. सरपंच अतुल गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
03006

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT