पुणे

वाल्हे परिसरात महसूल विभागाकडून पंचनाम्यास प्राधान्य

CD

वाल्हे, ता.२१ : वाल्हे (ता.पुरंदर) परिसरामध्ये सोमवारी (ता. २०) झालेल्या वळवाच्या वादळी पावसामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह घर, किराणा दुकान, गुरांचे गोठ्यांचे पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात नागरिकांनी मागणी केली होती. याबाबत महसुल विभागाच्या वतीने मंगळवारी (ता.२१) पंचनामे केले असल्याचे गावकामगार तलाठी संजय उमाप यांनी सांगितले.

वळिवाच्या पावसामध्ये नागरिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याने नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठी त्वरित पंचनामे करण्याची मागणी संदर्भात सकाळने आज ‘वळिवाच्या झटक्याने होत्याचं नव्हतं’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत महसुल विभागाने आज वाल्हे परिसरामध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे पूर्ण केले.

वाल्हे परिसरामधील आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी परिसरामध्ये वळवाच्या पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावत माळवाडी येथील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संपूर्ण छत उडाल्याने शाळेच्या चार खोल्यांमधील शालेय कागदपत्रांसह, पाठ्यपुस्तके, संगणक, टीव्ही, खेळाचे साहित्य आदी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले. माळवाडी येथील किराणा व्यावसायिक राहुल विष्णू भुजबळ यांच्या किराणा दुकानावरील पत्रे उडाल्याने दुकानातील बहुतांश साहित्य भिजले तर पानमळा येथील अनिल राजाराम पवार यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांच्या घरातील सर्व साहित्य भिजून मोठे नुकसान झाले तर येथील प्रकाश भुजबळ यांच्या दुचाकीवर विजेचा खांब पडल्याने दुचाकीचेही तर चाहुरवस्ती येथील महेश राऊत यांच्या घराचे संपूर्ण पत्रे उडून गेल्याने पावसामध्ये त्यांच्या घरातील सर्व साहित्य भिजल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला.

यावेळी मुख्याध्यापिका मनीषा चव्हाण, अंगणवाडी पर्यवेक्षिका अनिता भुजबळ, आनंद पवार, विशाल भुजबळ आदी उपस्थित होते. वळवाच्या वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यासंदर्भात पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाल्हे परिसरामधील ठिकठिकाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.
-संजय उमाप, तलाठी

03039

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT