पुणे

माळवाडीमधील नुकसानग्रस्त शाळेची खासदार, आमदारांकडून पाहणी

CD

वाल्हे, ता. २३ : वाल्हेनजीक माळवाडी येथील शाळेची पत्रे उडून गेल्याने शाळा बेसूर दिसू लागली. हे पाहून बुधवारी (ता. २२) खासदार सुप्रिया सुळे या काहीशा भावुक झाल्या. त्यांनी तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून शाळा पुन्हा सुस्थितीत त्वरित करा, असा आदेश दिला.

वाल्हे (ता. पुरंदर) परिसराला सोमवारी अचानक आलेल्या वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. यात शाळेचे संपूर्ण छत उडाले. यामध्ये खोल्यांमधील कागदपत्रांसह, पाठ्यपुस्तके, संगणक, टिव्ही, खेळाचे साहित्य आदी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, बुधवार (ता.२२) खासदार सुप्रिया सुळे यांनी चारा छावणीला भेट देण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी नुकसानग्रस्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी आमदार संजय जगताप, पुष्कराज जाधव, हनुमंत पवार, सागर भुजबळ, संभाजी पवार, अंकुश पवार, धनंजय पवार, प्रवीण कुमठेकर, विशाल भुजबळ, वनराज पवार, दीपक पवार आदी उपस्थित होते.
दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा चव्हाण यांनी कामकाजाचा आढावा देताना त्या भावुक झाल्या.
यावेळी खासदार सुळे यांनी त्यांनी धीर देत शाळा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी व आमदार संजय जगताप यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून येणारे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळेचे कामकाज तातडीने पूर्ण करण्याबाबतचे आदेश दिले.
दरम्यान, यावेळी हनुमंत पवार व सागर भुजबळ यांनी नुकसान याबाबत खासदार सुळे व आमदार संजय जगताप यांना माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT