पुणे

गूढ आवाज, हादऱ्याने पुरंदरमध्ये भीतीचे वातावरण

CD

वाल्हे, ता. ७ : पुरंदर तालुक्यातील काही गावांमध्ये मंगळवारी (ता. ७) दुपारी २ वाजून १४ मिनिटांनी भूगर्भात गूढ आवाज आल्याची घटना घडली आहे.
अचानक झालेल्या आवाज व हादऱ्यामुळे हा भूकंप असावा, असा ग्रामस्थांचा समज झाला होता. दरम्यान, या आवाजाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.
वाल्ह्यासह नीरा, आडाचीवाडी, वागदरवाडी, सुकलवाडी, पिंगोरी, दौंडज, हरणी, जेऊर, मांडकी, राख, पिसुर्टी आदी परिसरात हा गूढ आवाज व सौम्य धक्का जाणवला. आज वाल्हे येथील आठवडे बाजार असल्याने दुपारी अचानक झालेल्या आवाज व हादऱ्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहक भयभीत झाले. दरम्यान याबाबत जेजुरीचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला असता, भूगर्भातील गूढ आवाज जेजुरी, वाल्हे, नीरा, सासवड
परिसरातील बहुतांश गावांमध्ये झाल्याचे समजत आहे. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, सुरक्षिततेचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी पक्क्या घरात थांबावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Beed Crime : बीडमध्ये खळबळ! माजी सभापतीच्या मुलाने विवाहितेला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार; 'या' कारणामुळे घाबरली होती महिला

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

SCROLL FOR NEXT