पुणे

वाल्हे वाल्मिकी विद्यालयात सन्मान स्त्रीशक्तीचा उपक्रम

CD

वाल्हे, ता. ८ : वाल्हे (ता.पुरंदर) येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य सतीश निगडे, संगीता भुजबळ, पूर्वा राऊत, शीतल मदने, प्रमिला पवार, कविता पवार, दादासाहेब मदने, राजेशकुमार सोनवणे आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थिनींनी दौंडज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा म्हेत्रे, माळवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा चव्हाण, अंगणवाडी सेविका सोनाली चव्हाण, कोमल पवार, मालती गायकवाड, सरोजिनी कारंडे, हेमलता जाधव, आरोग्य सेविका स्वाती भुजबळ आदी महिलांचा सन्मान केला. यावेळी विनोद शिंदे यांनी सूत्रसंचालक केले. विद्यालयातील सहशिक्षिका शैला गवारी, प्रियांका कणेरे, अर्चना सासवडे, उज्वला करे, नीता कांबळे, मयूरी पवार, अनुराधा पालखे, राणी फडतरे आदींचा सन्मान करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मी सावित्री बोलतेय’ एकपात्री नाटिकेसह डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जीवनपरिचय नाटिका सादर केली. विद्यालयाचे प्राचार्य सतीश निगडे यांनी प्रास्ताविक केले. गीतांजली मोरे, राजेंद्र डोंगरे यांनी सूत्रसंचालन तर बाळासाहेब घोडके यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT