वाल्हे, ता.२५ : पावसाळ्यात जनावरांनी लागणाऱ्या वैरणीची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा चाऱ्याचा साठा करत असताना दर वाढण्यापूर्वीच शेतकरीवर्ग पावसाळ्यात जनावरांची गैरसोय दूर करण्यासाठी लागणारा चारा साठवून ठेवण्यात व्यग्र आहेत. परिसरामध्ये कडब्याच्या गंजी रचण्यास पशुपालकांची लगबग सुरू आहे.
हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेतात काढून ठेवलेला कडबा भिजू नये यासाठी शेतकरी ट्रक्टरमधून तो घरी नेत आहेत.
उन्हाळ्यात सुका चारा म्हणून कडबा उपयोगी येतो. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने सुका चारा जास्त प्रमाणात लागतो. ज्वारीच्या काढणीस मजूर मिळत नसल्याने रब्बी हंगामात ज्वारीपेक्षा गहू मोठ्या प्रमाणात घेतला जातो. गहू काढणीसाठी हार्वेस्टर मशिनचा वापर केला जातो. सध्या कडब्याच्या किमती वाढत चालल्या आहेत. सध्या चांगल्या कडब्याला शेकडा तीन ते चार हजार रुपये बाजारभाव मिळत आहे. उन्हाळ्यात चाराटंचाई निर्माण होते. सुका चारा म्हणून दूध उत्पादक शेतकरी कडबा विकत घेतात. त्यातच अवकाळी पावसाची शक्यता असल्याने कडबा घरी नेण्यासाठी पशुपालक धावपळ करीत असल्याचे अमोल खवले यांनी सांगितले.
04331
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.