पुणे

वाल्ह्यात प्रवाशांना उन्हाचे चटके

CD

वाल्हे, ता. ९ : पुणे- पंढरपूर पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणादरम्यान वाल्हे (ता. पुरंदर) येथील एसटी बसस्थानक शेड काढले आहे. अनेक दिवसांपासून येथे प्रवाशांना उभे व बसण्यासाठी सुसज्ज बसस्थानक व्हावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना एसटी बसची वाट पाहताना रखरखत्या उन्हात चटके सोसावे लागत आहेत.
ऊन, वारा, पावसात ताटकळत बसची वाट पाहणाऱ्या आबालवृद्धांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर बसथांबे नसल्याने रहिवाशांसह नवख्या प्रवाशांची दिशाभूल होत आहे. महामार्गाच्या विस्तारीकरणादरम्यान येथील मोडकळीस आलेले बसस्थानक जमीनदोस्त केले आहे. त्यामुळे नवीन ठिकाणी नव्याने बसस्थानक बांधण्यात यावे व प्रवाशांना सुविधा मिळावी, अशी मागणी जनसामान्यांतून अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, कोणतेच सोयरसुतक नसलेल्या प्रशासनाला याची झळ अद्याप पोहोचलीच नाही.
वाल्हे परिसराला पिंगोरी, हरणी, मांडकी, दौंडज, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी आदी गावे वाहतुकीने जोडली गेली आहेत. येथून जेजुरी औद्योगिक वसाहतीसह पुणे, मुंबई, बारामती, सातारा आदी ठिकाणी नागरिक प्रवास करत आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे महामंडळाचा कारभार वाऱ्यावर आहे.

वाल्हे (ता. पुरंदर) : एसटी बसची वाट पाहताना प्रवासी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT