पुणे

वरुणराजामुळे राख परिसरातील बळिराजा सुखावला

CD

वाल्हे, ता.२४ : राख (ता.पुरंदर) परिसरात काही दिवसांपासून वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने छोटे-माठे ओढे-नाले-बंधारे भरण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. या पावसाने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांसह राखच्या माजी सरपंच उमाजी गजानन रणनवरे यांनी व्यक्त केला.
राख परिसरातील जिरायत भागाला नाले-बंधारे खोलीकरणाची मोहीम वरदान ठरणार आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या दृष्टीने या पावसाचा लाभ होणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. परिसरातील बहुतांश ठिकाणी पाणी साचल्याचे दृष्य पाहायला मिळत आहे. ज्याची चातकासारखी वाट पाहत होतो त्या पावसाने हजेरी लावल्याने नाले-बंधाऱ्यामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. जलस्त्रोतांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहावा अशीच सर्वांची अपेक्षा असल्याचे विनायक पवार यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

विहीर-कूपनलिकेची पाण्याची पातळी वाढणार
शेतीतज्ञांनी शेतकऱ्यांना जून महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून पिकांची पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग शेतीकामाच्या तयारीला लागले आहेत. संततधार पावसाने दमदार हजेरी लावून धरल्याने जिरायती भागाला दिलासा मिळाला आहे. कमी-अधिक पावसामुळे परिसरातील पाणवठ्यामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाल्याने या पाण्याने परिसरातील विहीर-कूपनलिकेची पाण्याची पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. जिरायती भागात खरीप हंगामासाठी पावसाची गरज होती. त्यामुळे बळिराजा सुखावला असल्याचे गजानन रणनवरे यांनी सांगितले.

04583

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP vs Chhawa: सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा! राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जबर हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Best Bus: बसच्या संख्येत घट, प्रवाशांची गैरसोय; मुंबईकरांची खाजगी बससाठी मागणी

Video Viral: तरुणाचा उद्दामपणा! इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये चिकन खाल्लं, भक्त संतप्त... व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

Gatari Amavasya: गटारी अमावस्येच खरं नाव काय? अर्थ आणि यंदाची तारीख जाणून घ्या एका क्लिकवर!

WTC Final पुढील सहा वर्षात तरी भारतात होणार नाहीच! ICC ने तीन फायनलसाठी जाहीर केले ठिकाण

SCROLL FOR NEXT