पुणे

मशागतींच्या कामांना वाल्हे परिसरात वेग

CD

वाल्हे, ता.१ : मागील चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतामध्ये वाफसा तयार झाला आहे. यामुळे वाल्हे परिसरात खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीसह इतर कामांना वेग आला आहे.
वाल्हे परिसरातील पिंगोरी, दौंडज, जेऊर, पिसुर्टी, राख परिसरात मुसळधार पाऊस पडला. मांडकी, गुळुंचे आदी भागामध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने पाणी टंचाईग्रस्त भागांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे मोठा आधार
मिळाला आहे. दरम्यान, चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतात वाफसा तयार झाल्याने खरीप हंगामातील पूर्व मशागत पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी महत्त्वाची असल्याने मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे.
जूनच्या सुरुवातीला सुरू होणारा खरीप हंगाम ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत असतो. या हंगामातील पेरणी मे ते जुलै या काळात सुरू असते. खरीप हंगामातील पिकांची कापणी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होते आणि काही पिकांची काढणी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत चालते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank of Baroda: 'बँक ऑफ बडोदा'चा डेटा कसा 'लीक' झाला? ग्राहकांना धोका आहे का? बँकेने दिलं अधिकृत स्पष्टीकरण

Virar Timber Smuggling: विरारमध्ये भाजीपाल्याच्या टेम्पोआडून खैर लाकडाची तस्करी उधळली; वन विभागाची पहाटे धाडसी कारवाई, मुद्देमाल जप्त

Kelghar Ghat Landslide : चालक अजरुद्दीनच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव! केळघर घाटात जेसीबीवरच मोठी दरड कोसळली; महाबळेश्वर-सातारा मार्ग पूर्णपणे ठप्प

Bhima River Farmers: भिमा नदीत पाणी सोडूनही वीज नाही; संतप्त नदीकाठच्या शेतकऱ्यांची ‘आठ तास वीज नसेल तर पाणीही नको’ अशी सोशल मीडियातून हाक

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT