पुणे

अजितदादा, नव्या पिढीचे ‘आयकॉन’

CD

अजितदादा पवार हे समतावादी, धर्मनिरपेक्ष, विकासाभिमुख विचारसरणी असलेले नेते म्हणून उदयाला आले. त्यांनी पारंपरिक राजकारणाच्या चौकटीत न अडकता एक वेगळी आणि नावीन्यपूर्ण राजकीय शैली साकारली. जी त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीची आणि मूल्यांची होती. म्हणूनच तरुणाईने त्यांना डोक्यावर घेतले.
- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे
अध्यक्ष : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. पुणे.

दादा हे केवळ नेता नाहीत, तर नव्या पिढीचे ‘आयकॉन’ आहेत. रुळलेल्या वाटेवर न जाता त्यांनी नवीन मार्ग निवडला, त्यात संकटे, काटे, धोके होते, पण त्यांनी ती स्वीकारली. आणि म्हणूनच ते आज नवीन ‘दादा पर्व’ घडवत आहेत.

नेतृत्व आणि निर्णयक्षमता
राजकारणात दादांनी असंख्य आव्हानांचा सामना केला. पण प्रत्येक वेळी त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. संकटे आली तरी त्यांनी ना कधी पाय मागे घेतले, ना चुकीचे खापर इतरांवर फोडले. कोणत्याही निर्णयामागे ते ठामपणे उभे राहतात. त्यांची तल्लख बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. मी स्वतः पी.डी.सी.सी. बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना दादांची दूरदृष्टी अनुभवली. बँकिंग, सहकार, शेती, शिक्षण, ऊर्जा, वित्त अशा प्रत्येक विषयात त्यांचे अद्ययावत ज्ञान आम्हाला मार्गदर्शक ठरले.

पराभव झाला तरी पाठ थोपटली
मी एक सामान्य, राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता. मनी पॉवर नाही, मसल पॉवर नाही. पण तरीही दादांनी मला सात वर्षे अध्यक्ष म्हणून संधी दिली. विधानसभेसाठी उमेदवारी दिली. पराभव झाला तरी पाठ थोपटली. हाच खरा नेतृत्वाचा मोठेपणा. दादांच्या मार्गदर्शनामुळे बँकेचा ढोबळ नफा ४१८.३२ कोटींवर पोहोचला. सी.डी. रेशो ८३.१९ टक्के झाला. सीबीएस प्रणाली, एटीएम केंद्रे, गृहकर्ज, व्यावसायिक कर्ज, महिला बचत गट कर्ज योजना, शारदा ग्रंथालय, ISO सर्टिफिकेशन — हे सर्व दादांच्या दूरदृष्टीतून शक्य झाले.

बारामती मॉडेल – देशासाठी मार्गदर्शक
बारामती तालुका आज केवळ तालुका नाही, तर एक विकासाचे मॉडेल आहे. इतरजण ‘बारामतीसारखा विकास करू’ म्हणतात. हेच दादांचे कर्तृत्व आहे.
विकासाच्या नवनवीन कल्पना सतत त्यांच्या मनात असतात, पण त्या फक्त कल्पना राहत नाहीत. त्या प्रत्यक्षात उतरतात. म्हणूनच दादांचे नाव देशभर आदराने घेतले जाते.


समाजकल्याणाचे अर्थदर्शन
या वर्षी दादांनी मांडलेला अर्थसंकल्प हा समाजकल्याणकारी अर्थसंकल्प आहे. महिलांसाठी १५०० रुपये, मोफत सिलिंडर, वीज बिल माफी, विद्यार्थ्यांना विद्यावेतन, दुग्धउद्योगाला प्रोत्साहन अशा अनेक योजनांनी हा अर्थसंकल्प समाजाच्या गरजांना भिडणारा आहे.

अंतिम अभिवादन
दादा हे केवळ एक राजकारणी व्यक्तिमत्त्व नाही, तर सामान्यांचा विश्वासाचा केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या सोबत मा. सौ. सुनेत्रा वहिनी यांची खंबीर साथ आहे. त्यांच्या बारामतीतील कार्यातून ते सुद्धा राज्यासाठी एक प्रेरणास्त्रोत बनले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनातून हेच उद्गार येतात. ‘खरे बोलून, सडेतोड बोलून, वास्तव बोलूनही यशस्वी राजकारण करता येते, हे दादांनी दाखवून दिलं.’

दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!
महाराष्ट्राच्या नेतृत्वाची ही प्रकाशवाट अशीच उजळत राहो, हीच प्रार्थना!

04920, 04921

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT