पुणे

फळझाडांची रोपे देऊन पाहुण्यांचे स्वागत

CD

वाल्हे, ता. ३ : विवाह सोहळे वैभवशाली करण्यासाठी आजकाल लाखो रुपयांचा खर्च केला जातो, मात्र वाल्हे (ता. पुरंदर) येथील अभिजित राऊत व हर्षदा भुजबळ यांच्या विवाह सोहळ्यात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत आयुर्वेद व फळझाडांची रोपे देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे हा सोहळा सर्वांचे लक्ष वेधत होता.
सध्याच्या काळातील लग्नांमध्ये वारेमाप खर्च केला जातो. कोणी हेलिकॉप्टरने, तर कोणी बुलेट वाहनावर लग्न मंडपात आल्याचे पाहायला मिळते, मात्र काही असेही सोहळे आई-वडिलांना आदर्शवत असे पार पडले जातात. रविवारी (ता. ३) अनिल राऊत यांचे चिरंजीव अभिजित राऊत व सुरेश भुजबळ यांची कन्या हर्षदा भुजबळ यांचा विवाह सोहळा जेजुरी (ता. पुरंदर) येथे पार पडला. यामध्ये पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत वर आणि वधूकडील दोन्ही कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या मुलांच्या लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना आयुर्वेदिक व फळझाडांची रोपे देऊन शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी जोपासली. लग्न समारंभप्रसंगी वर व वधु बोहल्यावर चढण्यापूर्वी या दोन्ही नवदांपत्याने स्वतः आपल्या हस्ते रोपांचे वितरण करून पर्यावरणप्रेमी भावनेची जाणीव व्यक्त केली. नवदांपत्याचा हा अनोखा उपक्रम लग्नमंडपात चर्चेचा विषय बनला होता. यामुळे मंडपात सकारात्मक चर्चा रंगल्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा विवाह सोहळा समाजापुढे आदर्श उदाहरण ठरला.
सोहळ्यास उपस्थित असलेले पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पुण्याचे इतर मागास व बहुजन कल्याण विभागेचे सहसंचालक संतोष हराळे, सरपंच अतुल गायकवाड, संदेश पवार, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन लंबात, दीपक कुमठेकर, समदास राऊत आदींनी राऊत व भुजबळ कुटुंबीयांच्या पर्यावरणपूरक संकल्पनेचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT