पुणे

राखी बांधून परतणाऱ्या भावावर काळाचा घाला

CD

वाल्हे, ता. १० : रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाऊन परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात अंबाजीचीवाडी (ता.पुरंदर) येथील गणेश बाळासाहेब पवार (वय २४) या युवकाचा मृत्यू झाला. जुनी जेजुरी-कोळविहिरे मार्गावरील परिसरात शनिवारी (ता. ९) रात्री साडेनऊच्या दरम्यान हा अपघात घडला.
गणेश पवार अंबाजीचीवाडी येथून बारामतीमधील आपल्या आत्याबहिणीकडे रक्षाबंधनासाठी गेला होता. बहिणीने भावाला राखी बांधून त्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी मनोकामना केली. बहिणीने राखी बांधली. औक्षणही केले. त्यानंतर रात्री तो दुचाकीवरून घरी परतत होता. परंतु मोरगावमार्गे येत असताना जुनी जेजुरी - कोळविहिरे रस्त्यावर असलेल्या खराब रस्त्याच्या अवस्थेमुळे आणि अचानक आलेल्या गतीरोधकावरून त्याची दुचाकी घसरली. यामुळे तो रस्त्यावर आदळला आणि डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाला.
अपघातानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी त्याला तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी त्याला घोषित केले. गणेश पवार हा अत्यंत शांत स्वभावाचा, कुटुंबवत्सल आणि जबाबदार तरुण म्हणून ओळखला जात होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन आत्या आणि आजी असा परिवार असून त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेशचा मृत्यू रस्त्याच्या खराब स्थितीमुळे झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज एक उदयोन्मुख तरुण जीव गमावून बसला. यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत जेजुरी पोलिस ठाण्यामध्ये संबंधित विभागाच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल केली असल्याचे गोरख मेमाणे यांनी सांगितले.
दरम्यान, गावातील होतकरू युवक अपघातामध्ये मृत्यू पावल्याने अंबाजीचीवाडी ग्रामस्थांनी गावातील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केले. रविवारी (ता. १०) सकाळी गावकरी, मित्र आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत गणेशवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

05034

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana: ...तर आम्ही शस्त्रही उचलू; जैन समाजाच्या मुनींची थेट धमकी, कबुतरखान्यांवरील बंदीचा वाद चिघळला

Devendra Fadnavis: 'ओबीसी समाज दुरावल्याने यात्रेची आठवण'; मंडल यात्रेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Manoj Jarange: मुंबईत आंदोलन करणारच : मनोज जरांगे; 'मराठा नेत्यांना भाजपमध्ये त्रास'

MP Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनाही ‘ते’ दोघे भेटले: खासदार संजय राऊतांचा दावा; शरद पवारांच्या दाव्याचे समर्थन

Deputy Chief Minister: शिवसेना आपल्या पाठीशी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; श्रीनगरमध्ये घोडेवाल्याच्या कुटुंबीयांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT