पुणे

कोट्यवधींचा खर्च, तरीही रस्त्यावर खड्डे

CD

वाल्हे, ता. २१ : पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील सासवड (ता. पुरंदर) नजीक पवारवाडी ते बोरावकेमळा बाह्यवळण मार्ग नुकताच तयार करण्यात आला आहे. या बाह्यवळण मार्गाचे झालेले दर्जाहीन काम मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने उघडे पाडले आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रवास धोकादायक बनला आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या बाह्यवळण मार्गावरील रस्त्याची ही अवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. पुणे- पंढरपूर पालखी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर वाढलेली वाहतूक त्याचबरोबर सासवड शहरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने यावर पर्याय म्हणून पवारवाडी, सिद्धेश्वर मंगल कार्यालय ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा बोरावकेमळ्यापर्यंत बाह्यवळणमार्ग तयार केला आहे. सासवड शहराच्या वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी व कमी वेळात बाहेर पडण्यासाठी हा बाह्यवळणमार्ग उपयुक्त ठरत आहे. सासवड शहरात न थांबता पुण्याकडे जाणारी मोठी वाहतूक या बाह्यवळण मार्गाने वाहनांची वर्दळ मोठी होत आहे. मात्र, रस्ता तयार करताना तो समतल नसल्याने चारचाकी वाहनांना मोठे हादरे बसत असल्याचे काही चालकांनी सांगितले. या रस्त्यावर एक किलोमीटरच्या अंतरात जवळपास १२ ते १५ खड्डे असून वेगात असलेल्या वाहनांना अचानक खड्डे चुकविताना ब्रेक दाबावा लागत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
या रस्त्यावर दिशादर्शक, अपघाती ठिकाण असे फलक त्याचबरोबर उपरस्ता आदी ठिकाणी वेगनियंत्रक नसल्याने हा रस्ता धोकादायक ठरत आहे. पुलांवरील रस्ताही समतोल नसल्याने पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे हा रस्ता असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.

पुणे- पंढरपूर पालखी महामार्गाच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. कोट्यवधी रुपयांची कामे होत असताना त्यावर देखरेख नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, रस्ते समांतर नसणे, दिशादर्शक फलक व रस्त्याची गुणवत्ता याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा पुन्हा एकदा मोठे आंदोलन छेडले जाईल.
- अमोल बनकर, अध्यक्ष, पुरंदर तालुका दिव्यांग विकास संस्था

05103

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT