पुणे

किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत

CD

वाल्हे, ता. २३ : सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरातील पिकांना फटका बसला आहे. राख परिसरात सततच्या पावसामुळे पिकांची स्थिती
नाजूक बनली आहे. वाढ खुंटल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. घेवडा, बाजरी, तूर, भुईमुग, मका, सोयाबीन आदी पिकांवर विविध किडींचा हल्ला होत असल्याने वाढ खुंटली आहे. रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची लागवड केली होती. मात्र संततधार पाऊस व ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाशाचा अभाव निर्माण झाला आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांवर कीड व रोगांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. ढगाळ हवामान कीड व रोगांना पोषक असल्याने घेवडा, भुईमूग, मुग, मका, तूर, सोयाबीन, बाजरी आदि पिकांवर प्रादुर्भाव झाला आहे. अनेक ठिकाणी पाणथळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके पिवळी पडत आहेत. महागडी बियाणे, रासायनांची फवारणी करूनही पिकांची सुधारणा न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

संततधार पावसामुळे आमच्या शेतातील पिके पूर्णपणे रोगाच्या विळख्यात सापडली आहेत. पावसाने उसंत घेतल्यानंतर चांगली दिसणारी पिके आता सततच्या पावसामुळे किडरोगाच्या विळख्यात सापडली आहेत. या परिस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून, नुकसान भरपाई देण्यात यावी.
- विनायक पवार, शेतकरी


सद्यःस्थितीत परिस्थिती अजूनही गंभीर असून शेतकरी वर्गामधून शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
- प्रकाश भुजबळ, शेतकरी

अंजिराचा बहार जातो की काय?
आडाचीवाडी येथील अंजीर उत्पादक शेतकरी प्रशांत पवार यांनी सांगितले की, यावर्षी पावसाची सुरुवात लवकर झाल्याने अंजीर बहारही लवकर धरला होता. मात्र सध्याच्या ओलसर हवामानामुळे अंजीर बागांमध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने यंदाचा अंजिराचा बहार जातो की काय या चिंतेत अंजीर उत्पादक शेतकरी आहे.

05111

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Deaths Case : कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीवर ईडीची कारवाई, श्रीसन फार्मासह एफडीए अधिकाऱ्यांच्या ७ ठिकाणांवर छापे

Diwali 2025 Train Travel Tips: दिवाळीत ट्रेनचा प्रवास करताय? मग 'या' 6 वस्तू चुकूनही बॅगमध्ये ठेऊ नका

Pro Kabaddi 2025: टाय ब्रेकरमध्ये पुणेरी पलटनने मारली बाजी! दबंग दिल्लीवर ६-५ ने मिळवला विजय

Latest Marathi News Live Update: धनगर समाजाचा लातूर-सोलापूर महामार्गावर रस्ता रोको; एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी

IND vs WI 2nd Test Live: जॉन कॅम्बेलने शतकासह इतिहास रचला! व्हीव्ह रिचर्ड्स, कपिल देव यांच्या पंक्तित बसला; भारताचा डाव फसला

SCROLL FOR NEXT