पुणे

वाल्ह्यात ''संत दर्शन'' हलता देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

CD

वाल्हे,ता. ३१ : ''आली गवर आली, सोनपावली आली...'' अशा पारंपरिक गीतांच्या गजरात रविवारी (दि. ३१) गावोगावी ज्येष्ठा-कनिष्ठा गौराईचं मोठ्या उत्साहात वाजतगाजत स्वागत करण्यात आलं. वाल्हे (ता. पुरंदर) येथील सासू-सुनेचा ''संत दर्शन'' हलता देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
वाल्हे येथील शालन लंबाते व सम्राज्ञी लंबाते या सासू-सुनेने गौराईच्या स्वागतासाठी यावर्षी आध्यात्मिक संदेश देणारा "संत दर्शन विषयावरील हलता देखावा साकारला. महाराष्ट्राच्या संतपरंपरेला उजाळा देणाऱ्या या देखाव्यात संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन, संत ज्ञानेश्वर व संत चांगदेव भेट, संत ज्ञानेश्वर महाराज रेड्यामुखी वेद वदविताना, संत एकनाथ महाराज, संत सावतामाळी, गोरा कुंभार, भक्त पुंडलिक, श्रावणबाळ, संत गाडगेबाबा, संत बाळूमामा, संत रोहिदास, जनाबाई यांची सजीव रूपे कलात्मक पद्धतीने सादर करण्यात आली. दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे साकारणाऱ्या या मातृवधांचा उपक्रम यंदाही भाविकांचे विशेष आकर्षण ठरला. या सृजनशील देखाव्यामुळे भक्तांना संतांच्या कार्याची आठवण झाली तसेच गौराईसमोर आध्यात्मिक वातावरण तयार झाले. महिलांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या देखाव्याला भेट देत कौतुकाची थाप दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT