वाल्हे, ता. ४ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षी वाल्मीकी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते विधिवत पूजनाने झाली. या पारंपरिक आध्यात्मिक सोहळ्याचे यंदाचे हे ३९ वे वर्ष असून महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त शुक्रवार (ता. ३) ते बुधवार (ता. ८) या कालावधीत हा सप्ताह होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवारी कलश, वीणा, ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजनाने झाली. यावेळी माजी सरपंच अमोल खवले, शिवसेना तालुकाध्यक्ष अभिजित जगताप, समदास राऊत, संभाजी पवार, पोपट पवार, बाळासाहेब भुजबळ, दत्तात्रेय पवार, रवींद्र दुर्गाडे, आडाचीवाडीचे उपसरपंच मोहन पवार, प्रवीण कुमठेकर, मारुती रोकडे, राजेंद्र काळंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सप्ताहात पहाटे काकड आरती, सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भजन, दुपारी चारे ते सायंकाळी पाच हरिपाठ, सायंकाळी सात ते रात्री आठ प्रवचन, रात्री साडेनऊ ते अकरा कीर्तन, हरिजागर अशा दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता. ७) महर्षी वाल्मिकींच्या जयंतीनिमित्त महर्षींच्या प्रतिमेची वाल्हे गावांतर्गत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रामस्थ आणि कोळी समाज बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षण म्हणून जयंतीदिनी चैतन्य महाराज शिंदे यांचे फुलांचे कीर्तन, तर बुधवारी (ता. ८) साहेबराव पठेर महाराज (फलटण) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने हे आयोजन यशस्वी होत आहे. सातत्याने ३९ वर्षे चालणारा हा हरिनाम सप्ताह वाल्हे गावाच्या आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे. उद्योजक मोहन पवार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.