वाल्हे, ता. १४ : राख (ता. पुरंदर) येथील राख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी किसन सोमा महानवर, तर उपाध्यक्षपदी लालासाहेब तुकाराम पवार यांची बिनविरोध निवड झाली.
राख सोसायटीचे अध्यक्ष अध्यक्ष प्रमोद पवार व उपाध्यक्ष नंदकुमार पवार यांनी राजीनामा दिल्याने मंगळवारी (ता. १४) सासवड येथे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये निर्धारित वेळेत अध्यक्षपदासाठी महानवर व उपाध्यक्षपदासाठी पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यशवंती मेश्राम यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी रवींद्र रणनवरे, दत्तात्रेय रणनवरे, माजी अध्यक्षा वर्षा माने, सुशांत रणनवरे, राजाभाऊ रणनवरे, जवाहर रणनवरे, मधुकर सोनवणे आदि उपस्थित होते.
पुरंदर नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल उरवणे, महेश खैरे, विठ्ठल मोकाशी यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुनीता कोलते, महेंद्र माने, बबनराव ताटे, सुनील रणनवरे, बाबूराव पवार, आबासाहेब महानवर, अण्णा महानवर, अनिल गायकवाड, अवधूत रणनवरे, विलास रणनवरे, अनिल गायकवाड आदि उपस्थित होते. यावेळी सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी प्रथमेश हिराचंद गरुड व शिवाजी एकनाथ पवार यांची निवड करण्यात आली. निवडणूक
कामी सचिव श्रीकृष्ण पवार यांनी सहकार्य केले. विकी रणनवरे यांनी आभार मानले.
राख विविध कार्यकारी सोसायटीच्या स्थापनेपासून या सोसायटीची धुरा रणनवरे भावकीकडे होती. दोन वर्षापूर्वी सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने बहुमत मिळवत सत्ता परिवर्तन घडवून आणले. महानवर भावकीला पहिल्यांदाच राख सोसायटीच्या नेतृत्वाची संधी मिळाली आहे.