पुणे

वाल्हे परिसरात बिबट्याचे दर्शन

CD

वाल्हे, ता. ३१ : वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील भुजबळ कामठवाडी येथील आंब्याचा मळा परिसरामध्ये गुरुवारी (ता. ३०) दुपारी शेतात कोमल सुशिल भुजबळ या महिला शेतकऱ्याला बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.
कोमल या ऊसाच्या शेतामध्ये खुरपणी करत होत्या. त्यावेळी त्यांना अवघ्या २० ते ३० फुटांवर अचानक बिबट्या ऊसाच्या शेतातून बाहेर पडताना दिसला. पहिल्या क्षणात भितीने त्या थरथरल्या, पण शिताफी दाखवत त्यांनी शेतातून पळ काढला. नंतर त्यांनी परिसरातील नागरिकांना माहिती दिली. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून, कर्मचाऱ्यांनी ताबडतोब परिसराची पाहणी केली. ग्रामपंचायत सदस्या मयुरी भुजबळ यांनी वनविभागाकडे त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली असून, या घटनेकडे गांभीर्याने पाहून तातडीने कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. वनविभागानेही सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : मला सूर्या भाईचा फोन आला अन्...; हर्षित राणा संघातून बाहेर पडताच पडद्यामागे काय घडलं? सिराजने सांगितला 'तो' किस्सा, पाहा VIDEO

Horoscope : नव्या आठवड्याची सुरुवात, नवे फायदे! उद्यापासून 'या' 6 राशींना अचानक मिळणार पैसे; पूर्ण होणार जुनी इच्छा

US Poverty Video : जागतिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेतही आहे भयंकर गरीबी; व्हिडिओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

Latest Marathi News Live Update : बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता

Bhimashankar Devotees Update : महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT