पुणे

मांडकीत इमारतीसह पायाभूत सुविधांची अभाव

CD

किशोर कुदळे : सकाळ वृत्तसेवा
वाल्हे, ता.२० : मांडकी (ता. पुरंदर) येथे ग्रामदैवताच्या मंदिरामागील मोकळ्या जागेत उघड्यावरच सुरू असलेला पशुवैद्यकीय दवाखाना परिसरातील
जनावरांसाठी ‘आधार’ ठरत आहे. मात्र, इमारत व पायाभूत सुविधांच्या अभावामुळे जनावरांना अपुरी सेवा मिळत आहे.
मांडकीसह जेऊर, पिंपरेखुर्द, पिसुर्टी, लपतळवाडी या गावांतील तीन हजारांहून अधिक जनावरांचे आरोग्य लालफितीत अडकले आहे. मांडकीच्या दवाखान्याअंतर्गत चार गावांमधील तीन हजार जनावरे आणि तितक्याच संख्येतील शेळ्या–मेंढ्यांचे आरोग्य अवलंबून आहे. मात्र अद्याप दवाखान्याची पक्की इमारत न झाल्याने शेतकऱ्यांना उपचारासाठी मोठ्या
अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मांडकी–जेऊर हा पट्टा ऊस लागवडीसाठी तालुक्यात अग्रस्थानी असतानाही पशुधनाच्या आरोग्य सेवेकडे मात्र कोणतेही लक्ष दिले गेले नाही, अशी शेतकऱ्यांची
तक्रार आहे. दवाखान्यासाठी कोणतीही कायमस्वरूपी इमारत नसल्याने कर्मचारी उघड्यावर उपचार देतात. बसण्यासाठी जागा नाही, स्वच्छतागृह नाही, पिण्याचे पाणी उपलब्ध नाही अशा अत्यंत न्यून सुविधांमध्ये पशुवैद्यकीय सेवा सुरू आहे. दरम्यान, दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात जंतनिर्मुलनाच्या १५०० गोळ्यांचे वाटप केले आहे.

एक वर्षापूर्वी दवाखान्यासाठी पाच गुंठे जागा शासनाने हस्तांतरित केली असली तरी इमारत उभारणीसाठी लागणारा निधी प्रत्यक्षात मिळालेला नाही. त्यामुळे कामाची प्रक्रिया कागदोपत्रीच अडकून पडली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी इमारत तातडीने उभी राहणे अत्यावश्यक आहे.
- मोहन जगताप, माजी संचालक सोमेश्वर



यांची आहे गरज
- नवीन प्रशस्त इमारत,
- १ परिचर
- वीज, पिण्याचे पाणी,
- स्वच्छतागृहासह अन्य सुविधा

सध्यस्थितीत मांडकी पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत सर्व गावांमध्ये लसीकरणाचे काम नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे सुरू आहे. मात्र दवाखान्याची कायमस्वरूपी इमारत नसल्याने उपचार करताना काही अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या मंदिरातील एका उपलब्ध खोलीतून जनावरांच्या औषधोपचाराचे काम आम्ही सुरू ठेवले आहे. दवाखान्यासाठीची जागा निश्चित झाली आहे; परंतु इमारत उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने काम रखडले आहे. निधी मिळताच दवाखान्याची इमारत उभारणीची प्रक्रिया तातडीने सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
- सागर जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी, मांडकी

लसीकरण
लाळ खुरकूत..........२५००
घटसर्प..........५००
लंपी..........२३००
इटी (शेळी व मेंढी)..........३०००
फऱ्या..........४००
राणीखेत (मानमोडी कोंबड्या)..........१६००
रेबीज..........५००
खनिज मिश्रण, चाटण विटा..........१००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur : क्रूझरचा टायर फुटला, ट्रॅक्टरला धडकून भीषण अपघात; ५ भाविकांचा मृत्यू, ७ ते ८ जण जखमी

शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं, तिथेच ठाकरे सेनेचे पंख तुटले; काँग्रेसची ताकद झाली क्षीण, राष्ट्रवादीला करावी लागणार कसरत!

New Labour Rules for Women Workers : महिला आणि गिग कामगारांसाठी मोठी खुशखबर! आजपासून नवे नियम लागू! जाणून घ्या काय सुविधा मिळणार?

Neha : 18 वर्षांचं करियर, 14-15 चित्रपट, 9 तर निघाले फ्लॉप..तरीही आज 40,00,00,000 कोटी संपत्तीची मालकीण, राजकीय घराण्याशी खास कनेक्शन

CET Exam : मार्च ते मे दरम्‍यान परीक्षा! इंजिनिअरिंग, फार्मसीसह विविध सीईटी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT