पुणे

बिबट्या बघताच उडाला थरकाप

CD

वाल्हे, ता. २२ : पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे शुक्रवार (ता. २१) रात्री उशिरा एक थरारक घटना घडली. शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या प्रवीण शिंदे या शेतकऱ्याच्या समोर अचानक बिबट्या उभा ठाकला. टॉर्चच्या मंद उजेडात समोर उभा असलेल्या बिबट्याचे डोळे चमकताच शिंदेंच्या अंगावर काटा उभा राहिला. क्षणभर मृत्यू समोर आल्यासारखे वाटत असतानाच त्यांनी शांतपणे मागे सरकत जीव वाचविला.
घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीने पोलिस पाटील राहुल शिंदे यांना मोबाइलवर संपर्क करून संपूर्ण माहिती दिली. पोलिस पाटलांनी त्वरित घराच्या दिशेने निघण्याचा सल्ला दिला आणि काही गावकऱ्यांसह ते घटनास्थळी रवाना झाले. या प्रसंगानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळेसच वीजपुरवठा दिल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागत असल्याची ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. पिंगोरीच्या डोंगराळ परिसरात बिबट्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याने पशुधन हानीच्या घटना वाढू लागल्या आहेत. वारंवार येथील पाळीव जनावरांवरही हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाला अनेकदा कळवूनही ठोस उपाययोजना न झाल्याची खंत सरपंच संदीप यादव यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESMA Act : भारत सरकारने गॅस तुटवड्यामुळे लागू केला एस्मा कायदा, LPG वितरणावर राहणार नियंत्रण, साठेबाजांची खैर नाही

पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, २२ महिन्यांनी जामीन मंजूर

Latest Marathi News Live Update : एलपीजी (LPG) गॅसच्या तुटवड्याचा हॉटेल व्यवसायावर परिणाम

विम्याच्या पैशांसाठी अपघाती मृत्यूचा बनाव, मृतदेहाशिवाय शवविच्छेदन अहवाल अन् FIR; पत्नीसह डॉक्टर आणि ४ पोलिसांना अटक

BCCI Rewards T20 WC Champions: वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाला १३१ कोटींचं बक्षीस; सूर्याची टीम झाली मालामाल

SCROLL FOR NEXT