पुणे

भक्तिरसात न्हाऊन निघाले वाल्हे

CD

वाल्हे, ता. २३ : हरिनामाच्या गजरात, टाळ, मृदंगाच्या तालात, पांडुरंगाच्या ओढीने भक्तिरसात न्हाऊन निघालेला श्री पांडुरंगराय महाराज पालखी सोहळा आज वाल्हेनगरीत दाखल झाला.
मुखी हरिनाम, हातात वैष्णवांची पताका, मनात पांडुरंगाच्या भेटीची ओढ, टाळ मृदंगाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. पालखीच्या आगमनानंतर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी स्वागत केले. पालखी सोहळा आद्यरामायणकार महर्षी वाल्मीकी मंदिरामध्ये मुक्कामासाठी विसावला.
आळंदीवरून पंढरपुरकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या पाडुरंगराय पालखी सोहळ्याने सासवड येथील मुक्कामानंतर रविवारी (ता. २३) सायंकाळी सव्वासहा वाजता महर्षी वाल्मीक ऋषी मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला. मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी राजेंद्र काळंगे, मारुती रोकडे, सुधाकर पवार, बबन महाराज भुजबळ, स्वप्निल पवार, दिलीप नाझरे, स्वप्निल सासवडे, सागर भुजबळ, मधुरा भुजबळ, वनिता गायकवाड, सीमा पवार, अश्‍विनी ननावरे आदींनी पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. मुक्कामाच्या ठिकाणी पालखी विसावल्यानंतर समाजआरती झाली. सोमवारी पहाटे साडेचार वाजता पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT