पुणे

जेऊरला खंडोबा मंदिरात भाविकांची गर्दी

CD

वाल्हे, ता. २६ : मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी, अर्थात चंपाषष्ठीचे औचित्य साधून जेऊर (ता. पुरंदर) गावाजवळील डोंगरमाथ्यावर वसलेल्या स्वयंभू खंडोबा-म्हाळसा-बाणाई मंदिरात आज दिवसभर भाविकांची गर्दी होती. पारंपरिक रितीरिवाज, भंडारा उधळण आणि जयघोषातून संपूर्ण परिसर मल्हारमय झाला. सकाळपासून देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठीपर्यंत चालणाऱ्या सहा दिवसांच्या उत्सवाचा समारोप आज विविध धार्मिक विधींनी झाला. कुलदैवत खंडोबा मंदिरांमध्ये हा उत्सव भक्तीभावाने साजरा केला जातो. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या इतर मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. कुलधर्म कुलाचार पार पडल्यानंतर मार्तंड भैरवाला तेलवणाचा विधी करण्यात आला. त्यानंतर तळीभंडारा उधळत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
दिवसभर दिवटी पेटवणे, तळी भरणे, भंडारा उधळणे, घरचे देव भेटवणे अशा कार्यक्रमांत भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
जेऊर नजीक डोंगरावर स्वयंभू खंडोबा म्हाळसाई बाणाई वास्तव्यास आहे. हेमाडपंथी शैलीतील या प्राचीन मंदिरात सकाळी दीपमाळ प्रज्वलित करून दहीभाताची पूजा बांधण्यात आली. पुरोहित सचिन आगलावे यांच्या मंत्रोच्चारात स्वयंभू लिंगास तसेच मार्तंड भैरवाच्या मूर्तीला दही, दूध आणि तेलाने अभिषेक करण्यात आला. वांग्याचे भरीत, कांदापात, भाकरी याचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर महाआरती, भंडारा-खोबऱ्याची उधळण आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. तेलवणानंतर नागदिवे आणि रोडग्याचा नैवेद्य दाखवून खंडोबाची तळी भरून आरती करण्यात आली. यावेळी भंडारा-खोबऱ्याची उधळण तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली.
याप्रसंगी उद्योजक तेजस पवार, उमेश पवार, तेजस दुर्गाडे, अशोक महाराज पवार, सचिन भुजबळ, प्रदीप चव्हाण, संजय खवले, सुधाकर पवार, आकाश भुजबळ, कुंडलिक तांबे, स्वप्निल लंबाते, उत्तम बुनगे, धनंजय भुजबळ उपस्थित होते. सचिन आगलावे यांनी कुलधर्म कुळाचार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT