पुणे

दौंडजमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू

CD

वाल्हे, ता. २९ : दौंडज (ता. पुरंदर) हद्दीतील नलावडेवाडी येथील परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर गुजरमळा येथे बिबट्याचे दर्शन झाले होते. परिसरात पुन्हा नलावडेवाडी जवळील जुनावना येथे एका गाईचा फडशा पाडल्याची घटना शनिवार (ता. २९) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिस पाटील दिनेश जाधव यांनी केली आहे.
दौंडज हद्दीतील नलावडेवाडी येथील रहिवासी सुभाष भिवा माने यांची जुना खंडोबा गडाच्या पायथ्यालगत जुनावना परिसरामध्ये जनावरांचा गोठा असून ते दुग्ध व्यवसायदेखील करतात. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या गोठ्याकडे गेले असता गोठ्यातील गाईवर हल्ला करून बिबट्याने भक्ष्य केले ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. यानंतर माने यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले व वनपाल दीपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक धनंजय देवकर यांनी तत्काळ दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महादेव माने, माजी उपसरपंच विजय फाळके, पांडुरंग माने, दत्ता माने, धनाजी माने आदी उपस्थित होते.


वाल्हे पंचक्रोशीतील पिंगोरी, मांडकी परिसरात बिबट्याकडून पाळीव जनावरांवर वारंवार हल्ले होत असतानाच शनिवारी आमच्या वस्तीवर बिबट्याने एन्ट्री करून एका गाईवर हल्ला करत ठार मारले आहे. संबंधित शेतकऱ्याला वनविभागाकडून तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई मिळावी. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तत्काळ बिबट्याला जेरबंद करावे.
- महादेव माने, सामाजिक कार्यकर्ते

दौंडज हद्दीतील जुनावना परिसरामध्ये बिबट्याने गाईवर हल्ला करून ठार झाल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. याची तत्काळ दखल घेत सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
-दीपाली शिंदे, वनपाल,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War मध्य पूर्वेतील युद्धाचा भारताला कसा बसणार फटका? महागाईची गणिते समजून घ्या

Rohit Sharma-Sanju Samson: 'दु:खी मत हो भाई...', T20 WC च्या पहिल्याच दिवशी रोहितने संजूला मिठी मारत काय सांगितलं होतं?; Video

Latest Marathi News Live Update : नागपूरातील नंदनवन परिसरात फुलांच्या होळीचा उत्साह

Pune Metro services : पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात धूलीवंदनामुळे तात्पुरता बदल, सेवा कधी सुरू, कधी बंद?

Daily Walking Diabetes Effects: दररोज ४५ मिनिटे चाललात तर रक्तातील साखरेवर होतो असा परिणाम; इन्सुलिन पातळीही राहते आटोक्यात

SCROLL FOR NEXT