पुणे

वाल्ह्यात वाचन संस्कृती फुलली

CD

वाल्हे, ता. १० : पुणे शहराला पुस्तकांची राजधानी बनवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ या अभिनव उपक्रमाला आता ग्रामीण भागातूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात गावात मंगळवारी (ता.९) नागरिकांनी जागोजागी बसून पुस्तक, मासिके व वृत्तपत्र वाचनाचा आनंद घेत या उपक्रमात सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळत असून, सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होत आहेत. शाळकरी विद्यार्थी, गृहिणी, वृद्ध नागरिक यांचाही सहभाग उत्साहवर्धक ठरला.
वाल्हे येथील श्रीमती शकुंतला भिवा राऊत या ९८ वर्षांच्या आजी आजही चष्म्याशिवाय वृत्तपत्र वाचतात, हे विशेष... वयोमानानुसार शरीर थकले असले, तरी डोळ्यांनी अजूनही वाचनाची साथ सोडलेली नाही. त्यांचा मुलगा सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक सुधाकर राऊत यांनी सांगितले की, आई आजही चष्म्याशिवाय वाचन करते आणि बातम्यांवर चर्चा करायला विसरत नाही. आई शिकलेली असल्यामुळे आजही बँकेत कोणतेही कागदपत्र असेल तर वाचून अंगठा न लावता सहजतेने स्वाक्षरी करते आणि तेही चष्म्याशिवाय, असे राऊत यांनी अभिमानाने सांगितले.


5959

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT