पुणे

वाल्हे परिसरातील डोंगरावर जाळरेषा

CD

वाल्हे, ता. २४ : वनक्षेत्रात उन्हाळ्यात लागणाऱ्या संभाव्य आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील भवानीमाता मंदिर परिसरातील डोंगरावर वनविभागाच्या वतीने बुधवारी (ता. २४) जाळरेषा तयार करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.
वनविभागाच्या हद्दीतील डोंगर परिसरात आतील व बाहेरील बाजूस रस्त्याच्या दुतर्फा ठरावीक अंतर ठेवून जाळरेषा टाकण्यात येत आहेत. यामुळे उन्हाळ्यात लागणाऱ्या आगीचा फैलाव रोखता येणार असून, डोंगर परिसरातील वनसंपदा, वृक्षलागवड व वन्यजीवांचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे. या कामामुळे वनक्षेत्र सुरक्षित राहणार असल्याने वन्यप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाल्हे परिसरातील डोंगररांगांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अवैध वृक्षतोड, मानवी हस्तक्षेप व दुष्काळी परिस्थितीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाण्याअभावी या भागातील वन्यजीव कासावीस होत असून, त्यांच्या संख्येतही घट होत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. मात्र अज्ञातांकडून लावल्या जाणाऱ्या आगीमुळे या रोपांना धोका निर्माण होऊ नये, तसेच वनक्षेत्रात आग पसरण्याचा धोका टाळण्यासाठी जाळरेषा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही आडाचीवाडीसह, वाल्हे भवानीमाता डोंगर परिसरात जाळरेषेचे काम करण्यात आले. या मोहिमेत वाल्हे येथील वनमजूर हनुमंत पवार, किरण पवार, महादेव खोमणे, लहू रणनवरे, प्रेम दाते आदी कर्मचारी सहभागी झाले होते. वाल्हे, आडाचीवाडी परिसरातील डोंगर क्षेत्रात नागरिकांनी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आग लावण्यास टाळावे तसेच वनसंपदा व वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

6041

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

SCROLL FOR NEXT