पुणे

दौंडज परिसरात बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ

CD

वाल्हे, ता. २९ : दौंडज (ता. पुरंदर) जवळील कदमवस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून रविवारी (ता. २९) रात्री बिबट्याने गोठ्यात घुसून दोन बोकड व दोन मेंढ्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
कदमवस्ती येथील रहिवासी सचिन लक्ष्मण कदम यांनी नेहमीप्रमाणे रविवारी रात्री घराशेजारील गोठ्यात आपली जनावरे बांधून घरी परतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे गोठ्याकडे गेले असता गोठ्यातील दोन बोकडे व दोन मेंढ्या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे त्यांना दिसून आले. जवळ जाऊन पाहणी केली असता सदर मेंढ्या व बोकडे अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले. या गोठ्यात गाई, वासरे तसेच एक शेळी सुरक्षित असल्याचे दिसून आल्याचे कदम कुटुंबीयांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर दुपारी वनपाल दीपाली शिंदे यांसह वनरक्षक अशोक फडतरे, हनुमंत पवार आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असल्याची माहिती वनपाल दीपाली शिंदे यांनी दिली. दरम्यान, कदम यांचा गोठा तारेच्या जाळ्यांनी पूर्णतः बंदिस्त असून त्याची उंची सुमारे सहा फूट इतकी मजबूत आहे, अशा परिस्थितीत बिबट्याने गोठ्यात प्रवेश कसा केला, याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्यापसमोर आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण आहे. दौंडज परिसरात गेल्या १५ दिवसांत बिबट्याचा हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी एका गाईचा बिबट्याने फडशा पाडला होता तर आता दोन बोकडे व दोन मेंढ्या या हल्ल्यात दगावल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

वनविभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित बिबट्याचा तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा तसेच परिसरात गस्त वाढवावी.
- अलका माने, सरपंच दौंडज

वाल्हे व दौंडज परिसरातील कदमवस्ती येथे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. प्राथमिक पाहणीत हा हल्ला बिबट्याचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या विभागाकडे पिंजऱ्यांची कमतरता असून पिंजरे उपलब्ध होताच आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ बसविण्यात येतील. तोपर्यंत परिसरात वनविभागामार्फत गस्त वाढविण्यात आली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळेस विशेष दक्षता घ्यावी.
- सागर ढोले, सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: पुण्यात निवडणुकीचा नवा पॅटर्न; 'हे' तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार

Video: धुरंधरच्या गाण्यावर पाकिस्तानी महिला पोलिसाचा तुफान डान्स; वर्दीवरचा व्हिडीओ व्हायरल

BMC Election: स्थगितीच्या सावलीत उमेदवारी! उघड नाराजी, तरी बॅकडोअर एन्ट्री! भाजपचा थरवळांसाठी खास डाव

BMC Election: 'आश्वासनं फसवी ठरली...'! डबेवाला संघटनेची उद्धव ठाकरेंवर नाराजी; महायुतीला पाठिंबा देत सत्ता बदलाचा इशारा

Latest Marathi News Live Update : ४२ लाखांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT