पुणे

आडाचीवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा

CD

वाल्हे, ता. २ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून गुरुवारी (ता. १) गावच्या स्वागत कमानीशेजारील ओढ्यात श्रमदानातून एक दगडी अनगड बांध व एक वनराई बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले जाणार असून गावाच्या जलसुरक्षेला बळकटी मिळणार आहे.
या कामात वनराई माती बंधारा सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करून बांधण्यात आल्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
अभियानामुळे गावात जणू ‘तुफान आलंय’ असे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून महिला, पुरुष, तरुण, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांपर्यंत सर्वांनीच या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. ‘आपले गाव-आपली जबाबदारी’ या भावनेतून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
श्रमदान उपक्रमात सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच मोहन पवार यांच्यासह सूर्यकांत पवार, सुरज पवार, भाऊसाहेब पवार, विनायक पवार, अनिल पवार, भुपेश पवार, तुषार पवार, दामोदर पवार, विद्या पवार, लता पवार, निता पवार, शकुंतला पवार आदी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामस्थांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता श्रमदानातून दगडी अनगड बांध व वनराई बंधारा उभारून
गावाच्या विकासासाठी आपली जबाबदारी निभावली.

श्रमदानातून उभारलेले अनगड बांध व वनराई बंधारे भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यास उपयुक्त ठरणार असून गाव स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
-सुवर्णा पवार, सरपंच, आडाचीवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

पैशांचा पाऊस! 8.5 कोटींच्या नोटांनी झाकला डान्स फ्लोअर; शाही लग्नाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल, एवढी मोठी कॅश पाहून वऱ्हाडी मंडळीही अवाक्

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात टेम्पो दुचाकीमध्ये भीषण अपघात, तीन जण जखमी

VIDEO : रोडवरची पाणीपुरी पडेल महागात! पाण्यात आढळला चक्क जिवंत उंदीर; नेटकरी म्हणाले, ही तर नॉनव्हेज पाणीपुरी!

Pune News : मुळशीत रिंग रोडच्या कामावेळी डंपर घरावर उलटला, दोन महिलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT