वाल्हे, ता. १० : वाल्हे (ता. पुरंदर)नजीक कामठवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्या चिमुकल्यांसाठी आनंद बाजार व खाऊगल्लीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी खरेदी-विक्रीचा अनुभव मिळावा, त्यांना व्यवहारज्ञान अवगत व्हावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. भाजी घ्या भाजी ताजी भाजी १० रुपये, वांगी ४० रुपये किलो, वाटाणा ४० रुपये किलो, भेळ ३० रुपये, वडापाव १५ रुपये, स्टेशनरी अशा अनेक वस्तू विकत व आवाज देत शाळेचा आवार मंडईसारखा गजबजून गेला होता.
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्या वतीने शनिवारी (ता. १०) आयोजित आठवडे बाजार व खाऊगल्लीचे
ग्रामपंचायत सदस्य तेजस दुर्गाडे व मयूरी भुजबळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी भरविलेल्या बाजारात आपल्या शेतात
पिकविलेला विविध प्रकारचा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. याप्रसंगी अंकुश दुर्गाडे, शांताराम दुर्गाडे, प्रदीप दुर्गाडे, उत्तम बुनगे, चंद्रशेखर दुर्गाडे, अनिल
दुर्गाडे, संदीप दुर्गाडे, दीपक दुर्गाडे, सुभाषभाऊ दुर्गाडे, लक्ष्मण मदने, दत्तात्रेय बुणगे उपस्थित होते. या उपक्रमात अंगणवाडीसह प्राथमिक शाळेतील इयत्ता
पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शेतातील भाजीपाला, फळभाज्या, कांदा, वांगी, अंडी आदींसह खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते. भाजीपाला, किराणाला, स्टेशनरीसह खाद्यपदार्थाची विक्री करून विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाद्वारे
जवळपास दहा हजार रुपयांपर्यंत उलाढाल केली.
मुख्याध्यापक प्रवीण किर्वे, सहशिक्षिका चेतना ओव्हाळ, अंगणवाडी सेविका ज्योती दुर्गाडे, मदतनीस शैला दुर्गाडे, शाळा व्यवस्थापन समिती
अध्यक्ष राहुल दुर्गाडे, प्रमिला चव्हाण, संगीता दुर्गाडे, कविता मदने, सोनाली बुनगे, प्रिया चव्हाण आदींनी उपक्रमाचे संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.