पुणे

कर्नलवाडी येथील पिके धोक्यात

CD

वाल्हे, ता. २५ : कर्नलवाडी (ता. पुरंदर) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पहाटे पडणाऱ्या दाट धुक्यामुळे गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. वातावरणातील बदलामुळे पिकांवर करपा, मावा व विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकरी पीक वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करताना दिसत आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
कर्नलवाडी येथील युवा शेतकरी मिलेश निगडे यांनी सांगितले की, दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकावर मोठा परिणाम होत आहे. कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. धुक्यामुळे गव्हावर तांबेरा, तर हरभऱ्यावर घाट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
यंदा रब्बी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून चढ्या भावाने रोपे खरेदी करून शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. मात्र, सध्या वाढलेल्या फवारणी खर्चामुळे आधीच वाढलेल्या लागवड खर्चावर आणखी भर पडत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.
पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विविध रोगनाशक फवारण्या सुरू असून, धुक्याचा हा प्रादुर्भाव कायम राहिल्यास नुकसान वाढण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

06285

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: अर्थसंकल्पाची सूत्रे 'या' महिला अधिकाऱ्याच्या हाती! निर्मला सीतारमण यांच्या सोबत बजेट तयार करणारी टीम कोण? वाचा इनसाइड स्टोरी

Viral Video: ''रोज दारु पितोस.. दारु पिऊनच गाडी चालवली असणार'', जखमी बॉयफ्रेंडच्या आईसमोरच गर्लफ्रेंडचा पारा चढला

Fire News: भीषण आग! सुक्या अन्न गोदामात अग्नितांडव; ७ जणांचा मृत्यू, २० कामगार बेपत्ता, घटनेनं खळबळ

एक- दोन नाही तर तब्बल 200 वर्षांनी बनतोय त्रिग्रही राजयोग ! येत्या 6 दिवसांत तीन राशींना येणार सोन्याचे दिवस

Latest Marathi news Update : आयसीसी टी२० विश्वचषक ट्रॉफीची पहिली झलक

SCROLL FOR NEXT