पुणे

वाल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘महाविस्तार’विषयी मार्गदर्शन

CD

वाल्हे, ता. ३ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्यांना महाविस्तार (एआय) अॅपविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विभागाने विकसित केलेले हे वन स्टॉप सोल्यूशन अॅप शेतकऱ्यांसाठी ‘डिजिटल मार्गदर्शक’ म्हणून काम करणार असल्याची माहिती सहाय्यक कृषी अधिकारी संतोष जायपत्रे यांनी दिली.
या अॅपमधील मराठी चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकरी मजकूर किंवा आवाजाद्वारे प्रश्न विचारू शकतात. काही क्षणातच संबंधित सल्ला उपलब्ध
होतो, हे या अॅपचे वैशिष्ट्य आहे.‘महाविस्तार’ अॅपचा घेण्यासाठी शेतकरी फार्मर आयडीद्वारे नोंदणी करू शकतात. शेतकऱ्यांना अचूक,
वैयक्तिक गरजेनुसार सल्ला देणे शक्य होत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. या अॅपद्वारे हवामान अंदाज, पीक लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग नियंत्रण, खत व्यवस्थापन, बाजारभाव, गोदाम सुविधा, मृदा आरोग्य अहवाल तसेच ‘डीबीटी’ वरील विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
तालुका कृषी अधिकारी, पुरंदर श्रीधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, जेजुरी
मंडलातील बहुतांश शेतकऱ्यांनी आतापर्यंत ‘महाविस्तार’ अॅपचा वापर सुरू केला आहे, अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी जायपत्रे यांनी दिली. शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार’ अॅपचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
यावेळी बजरंग पवार, तुषार पवार, दादा पवार, लता पवार, राहुल पवार, शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT