पुणे

राख येथे गुणवंतांचा सन्मान

CD

वाल्हे, ता. १६ : राख (ता. पुरंदर) येथील श्रीकृष्ण सेवा ट्रस्ट १११ तुळशी वृंदावन येथे रविवारी (ता. १५) महाशिवरात्रीनिमित्त विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या, तसेच शैक्षणिक, क्रीडाविषयक काम करणाऱ्या ११ जणांना श्रीकृष्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाशिवरात्रीनिमित्त १११ तुळशी वृंदावन येथील महादेव मंदिरात सकाळी नऊ विवाहित जोडप्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर होम हवनाचा कार्यक्रम झाला. याचे पौराहित्य बाळासाहेब मांडके व शंकर गुरव यांनी केले. भैरवनाथ भजनी मंडळ नीरा शिवतक्रार यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर उपस्थित भक्तांसाठी माजी पोलिस निरीक्षक चंद्रकांत टिळेकर यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम झाला, अशी माहिती श्रीकृष्ण सेवा ट्रस्ट राखचे अध्यक्ष किसन महाराज चव्हाण यांनी दिली.
यावेळी पदमाकर नामदेव भोंडे, रमेश एकनाथ पवार, नीलेश भगवान शेवते, गणेश दुर्योधन भोसले, बाळासाहेब लक्ष्मण यादव, सुरसिंग रामचंद्र नागवडे, मधुकर रामचंद्र टिळेकर, बाळासाहेब गेनबा झेंडे, नितीन बाळासाहेब ससाणे, बाळासाहेब गणपत थोपटे, दिलीप पंढरीनाथ कुंभारकर, सफीया फिरोज जमादार, सुलतान फिरोज जमादार आदींना उद्योजक दिलीप झेंडे यांच्या हस्ते श्रीकृष्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सतीश चव्हाण, गणपत शितकल, गंगाराम जाधव, तुकाराम भांडवलकर, बापूराव खंडाळे, सोमनाथ चव्हाण, सूरज चव्हाण, बाळासाहेब पांचाळ, सोमनाथ मदने, स्वराज साबळे, शेखर रणवरे, वैभव पांचाळ आदी उपस्थित होते.

06474

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT