पुणे

दहीभातातून साकारले नीरा येथे महादेवाचे रूप

CD

वाल्हे, ता. १६ : नीरा (ता. पुरंदर) येथील नीरा नदीच्या तीरावर निसर्गरम्य परिसरात असलेल्या श्री महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. १६) मंदिरातील स्वयंभू लिंगावर दहीभाताची पूजा बांधण्यात आली. या पूजेला शंभू महादेवाच्या अवताराचे कल्पक रूप देण्यात आल्याने भाविकांचे लक्ष वेधले गेले.
रविवारी (ता. १५) महाशिवरात्र उत्सव भक्तिभावात संपन्न झाल्यानंतर सोमवारी (ता. १६) महाशिवरात्र उत्सव महाप्रसाद वाटप कार्यक्रम
उत्साहात पार पडला. मंदिराच्या अमृतमहोत्सवी ७५व्या वर्षानिमित्त यंदाचा उत्सव विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी शंकराच्या पिंडीवर दहीभातातून डोळे, नाक, तोंड यांसह शंभू महादेवाचे आकर्षक स्वरूप साकारले होते. या अनोख्या अलंकाराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी आरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राजेश काकडे, राजेश चव्हाण, धनंजय काकडे, सुनील चव्हाण, भगवान माने, जितेंद्र पटेल, वर्धमान शहा आदींसह ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
फुलांची आरास व आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरुलिंग गारुळे, वसंत गारुळे, अमेय गारुळे, ओंकार गारुळे, शिवलिंग गारुळे, अर्चित कोरे, भारती गारुळे, उमा गारुळे, वनिता गारुळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

06478

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

Water Shortage : पिंपरी चिंचवड शहराला पाणीटंचाईच्या फेब्रुवारीतच झळा; ‘टँकर लॉबी’चे राजकारण असल्याचा नागरिकांचा आरोप

Latest Marathi News Update : काँग्रेस भवनातील गोंधळानंतर पुण्यात आज काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT