पुणे

नीरानगरी शिवरायांच्या घोषणांनी शिवमय

CD

वाल्हे, ता. २० : ढोल- ताशांचा दणदणाट, भगव्या पताकांनी सजलेली बाजारपेठ, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणांनी नीरा (ता. पुरंदर) नगरी दोन दिवस शिवमय झाली.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने ‘एक गाव, एक जयंती’ या संकल्पनेतून आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बाजारपेठ परिसर भगव्या पताका, फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाईने
उजळून निघाला होता. शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेतील शिवरायांच्या पुतळा परिसराची फुलांची आरास, आकर्षक रोषणाई आणि भगव्या पताकांनी सजावट केली होती. गुरुवारी (ता. १९) माजी सरपंच तेजश्री काकडे, ॲड. आदेश गिरमे व वसंतराव दगडे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, माजी उपसरपंच राजेश काकडे, उद्योजक संदीप धायगुडे, राजेंद्र बरकडे, योगेंद्र माने, बाळासाहेब भोसले, प्रमोद काकडे, ॲड. पृथ्वीराज चव्हाण, विजय शिंदे, अनंता शिंदे, अजित सोनवणे, राहुल जेधे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शुक्रवार (ता. २०) सायंकाळी बुवासाहेब चौकातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. आकर्षक रथावर सिंहासनावर विराजमान शिवरायांची भव्य मूर्ती, अश्वस्वार युवती, स्वराज्यकालीन सजीव देखावे आणि लेझीम पथक मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. चिमुकल्यांनी मावळ्यांची वेशभूषा साकारत सर्वांचे लक्ष वेधले.
येथील शिवजयंती उत्सवात यंदा प्रथमच डिजेविरहित मिरवणूक काढण्यात आली. पोलिस प्रशासन व स्थानिक पत्रकारांनी ध्वनिप्रदूषण टाळण्याबाबत केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उत्सव समितीने हा निर्णय घेतला.

06520, 06521, 06522

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT