वाल्हे, ता. २१ : मांडकी (ता. पुरंदर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय उत्सव साजरा करण्यात आला. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. उत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली.
बुधवारी (ता. १८) लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. गुरुवारी (ता. १९) महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शुक्रवारी (ता. २०) ‘होम मिनिस्टर- करू या जागर स्त्री शक्तीचा, खेळ खेळूया पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभिनेत्री मेघना झुझम (होम मिनिस्टर फेम) यांच्या विनोदी सूत्रसंचालनामुळे वातावरणात अधिकच रंगत आली. या स्पर्धेत शुभांगी जगताप यांनी बाजी मारत पैठणीचा मान पटकावला, तर कोमल मोरे, पूजा साळुंखे, सारिका शिंदे, सुजाता जाधव, द्वारका शिंदे, छाया जगताप, सुवर्णा जगताप, लक्ष्मी जगताप, पुनम जगताप या उपविजेत्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे, डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, पोलिस पाटील श्रीतेज जगताप, पंचायत समिती सदस्य प्रवीण जगताप, अमित झेंडे, सायली शिंदे, विजय साळुंके, नरसिंग जगताप, राहुल जगताप, नितीन जगताप आदी उपस्थित होते.
विकास जगताप, अशोक शिंदे, महेंद्र साळुंके, रोहित भोसले, दिनेश जगताप, गणेश शिंदे, योगीराज जगताप, रणजित काशीद, अमोल भोसले, योगेश काशीद आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
महेंद्र साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. विकास जगताप यांनी सूत्रसंचालन, तर अशोक शिंदे यांनी आभार मानले.
06530
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.